बातम्या

ऑक्टोबर हिटचा पार 30 अंश सेल्सिअसवर

सकाळ न्यूज नेटवर्क

पुणे - शहर आणि परिसरात गेल्या दोन दिवसांपासून पावसाची रिमझिम थांबली आहे. त्यामुळे गेल्या तीन दिवसांपासून उन्हाचा चटका वाढत असल्याचे निरीक्षण हवामान खात्याने नोंदविले आहे. मात्र, उद्या (ता. २३) हलक्‍या स्वरूपाचा, तर मंगळवारपासून (ता. २४) पुढील दोन- तीन दिवस हलक्‍या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाजही खात्याने रविवारी वर्तविला.

शहरात गेल्या रविवारपासून ते गुरुवारपर्यंत पावसाच्या सरीवर सरी पडत होत्या. त्यामुळे कमाल तापमानाचा पारा २६ अंश सेल्सिअसच्या दरम्यान नोंदला जात होता. गुरुवारी कमाल तापमानाचा पारा २९.४ अंश सेल्सिअसपर्यंत वाढला तरीही त्यानंतर पडलेल्या पावसामुळे कमाल तापमान २८ अंश सेल्सिअसपर्यंत खाली आला. मात्र, गेल्या दोन दिवसांपासून पावसाची रिमझिम थांबल्याने कमाल तापमान पुन्हा ३० अंश सेल्सिअसच्या पुढे नोंदले जात आहे. त्यातून पुणेकरांना ‘ऑक्‍टोबर हीट’ची चाहूल लागली.  

अरबी समुद्रातील परिसरात असलेले कमी दाबाच्या क्षेत्राची तीव्रता वाढत जाऊन चोवीस तासांत त्याचे चक्रीवादळात रूपांतर होणार आहे. यानंतर पुढील ७२ तासांमध्ये ते ओमानच्या दिशेने सरकेल. यामुळे राज्यातील बहुतांशी भागांत पावसाने उघडीप दिली आहे. राज्याच्या बहुतांश भागात उन्हाचा चटका जाणवत होता. त्यामुळे वातावरणात काही प्रमाणात उकाड्यात वाढ झाली. 

बंगालच्या उपसागरात चक्राकार वाऱ्याची स्थिती आहे. यामुळे येत्या सोमवारी (ता. २३) व मंगळवारी (ता. २४) काही प्रमाणात हवामान ढगाळ राहणार असून, तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्‍यता आहे. तसेच विदर्भात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाच्या सूत्रांनी वर्तविला आहे. 

परतीच्या पावसाचा प्रवास सुरू होण्यास काही दिवसाचा कालावधी बाकी असताना राज्यातील वातावरणात वेगाने बदल होत आहे. अनेक भागात उन्हाचा चटका वाढत असताना काही ठिकाणी पावसाच्या अधूनमधून सरी बरसत आहे.  यामुळे कमाल तापमानात चढउतार होत आहेत.

Web Title: October Heat in Pune
 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Raigad Lok Sabha: मोठी बातमी! सुनील तटकरेंसह रायगडमधील ४ उमेदवारांना निवडणूक आयोगाकडून नोटीसा

Breakfast Recipe: ज्वारीच्या पीठापासून बनवा झटपट पौष्टीक नाश्ता

Actor Bernard Hill Dies : 'टायटॅनिक' चित्रपटातला कॅप्टन काळाच्या पडद्याआड, वयाच्या ७९ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Today's Marathi News Live : पुण्यात मतदानाच्या दिवशी सर्व आठवडी बाजार बंद राहणार

Madhya Pradesh Crime: वाळू माफियांनी पोलीस अधिकाऱ्याला ट्रॅक्टरने चिरडलं, परिसरात दहशतीचं वातावरण

SCROLL FOR NEXT