बातम्या

आता २००० रुपयांच्या नोटांची छपाई बंद?

सिध्दी सोनटक्के

आरबीआयने आर्थिक वर्ष २०१६-१७ मध्ये २००० रुपयांच्या ३,५४२.९९१ मिलियन नोटांची छपाई केली होती. तर, २०१७-१८ मध्ये छपाईत कपात झाली आणि १११. ५०७ मिलियन नोटा छापण्यात आल्या. यानंतर २०१८-१९ मध्ये २ हजार रुपयांच्या नोटांच्या छपाईमध्ये अजून कपात करण्यात आली व केवळ ४६.६९० मिलियन नोटाच छापण्यात आल्या होत्या. तर सध्याच्या चालू आर्थिक वर्षात एकही नोट छापण्यात आली नाही, अशी माहिती आरबीआयने ‘द न्यू इंडियन एक्सप्रेस’ने माहिती अधिकारांतर्गत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना दिली आहे.

भारतीय चलनातील २००० रुपयांच्या नोटांची छपाई थांबविण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. सध्याच्या चालू आर्थिक वर्षात २००० रुपयांची एकही नोट छापली नसल्याची माहिती आहे. माहिती अधिकारात विचारलेल्या प्रश्नाला आरबीआयने दिलेल्या उत्तरातून याबाबतचा खुलासा झाला आहे.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने २०१६ मध्ये ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा चलनातून बाद केल्या. त्यानंतर नव्या ५०० आणि २००० रुपयांच्या नोटा चलनात आल्या. तसेच १०, २०, ५० आणि २०० रुपयांच्या नव्या नोटाही चलनात आणल्या गेल्या. दरम्यान, काळा पैसा बाहेर काढण्यासाठी ५०० आणि १००० रुपयांची नोटा चलनातून बाद करण्यात आल्या होत्या. त्यानंतर २००० रुपयांची नोट चलनात आणण्यात आली. यावरून केंद्र सरकार आणि आरबीआयवर टीकाही झाली. जाणकारांच्या मतांनुसार, जास्त मूल्याच्या या नोटेमुळं पुन्हा काळा पैसा वाढेल. याशिवाय २००० रुपयांच्या नोटेमुळं सुट्ट्या पैशांची समस्याही वाढेल, असंही त्यांनी सांगितलं होतं.

यापूर्वीही दोन हजार रुपयांच्या नोटांची छपाई बंद झाल्याचे वृत्त आले होते, पण सरकारने ते वृत्त फेटाळलं होतं. २ हजार रुपयांच्या नोटांची छपाई बंद करण्यामागे काय कारण आहे, किंवा केव्हापर्यंत छपाई बंद असेल याबाबत आरबीआयकडून कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. बिझनेस स्टॅंडर्डने अधिकाऱ्यांच्या आधारे दिलेल्या वृत्तानुसार, दोन हजार रुपयांच्या उच्च नोटांची तस्करी करणे सुलभ आहे, त्यामुळे चलनात अधिक प्रमाणात २ हजार रुपयांच्या नोटा आल्यास ते सरकारच्या उद्दीष्टांसाठी धोकादायक आहे.


Web Title: Now printing of rupee notes is off


 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

T20 World Cup 2026 Points Table: टीम इंडिया सुपर-८ मध्ये दाखल; पाकिस्तानचं वर्ल्ड कपमधील भवितव्य धोक्यात!

कैसा हराया? टीम इंडियाने पाकिस्तानला धूळ चारल्यानंतर भारतीयांचा जल्लोष, VIDEO

भारताच्या वादळात पाकिस्तान उडाला; गोलंदाजीपुढे अख्खा संघ धडाधड गडगडला, टी२० विश्वचषकाच्या सामन्यात टीम इंडियाची विजयी गर्जना

India vs Pakistan: हार्दिकचा कारमाना पाहून तीनवेळा टेबलावर मारला हात; कोच गौतम गंभीरची रिअॅक्शन व्हायरल

Punjab CM : मुख्यमंत्र्यांची तब्येत बिघडली; फोर्टिस रुग्णालयात दाखल

SCROLL FOR NEXT