बुलढाणा - बुलढाणा जिल्ह्यात कृषी विभागाने जाहीर केलेल्या यादीमुळे, आता शेतकऱ्यांना नाहक मनस्ताप होतो आहे. ज्या शेतकऱ्यांकडे बियाणेच नाहीत, अशा शेतकऱ्यांची नावे या यादीत आहे. अशी माहिती कृषि अधिकारी नरेंद्र नाईक यांनी दिली आहे. Names of non-seeded farmers in the list, confusion of the Department of Agriculture
हे देखील पहा -
पण याहूनही अधिक गंभीर गोष्ट आहे. ती म्हणजे त्या बियाण्यांची उगवण क्षमता देखील यात नमूद केल्याने शेतकरी संतप्त झाले आहेत.
कृषी विभागाने कोणत्याही प्रकारची चौकशी न करता ही नावे कशी दिली. तसेच आमच्या या बियाण्याची उगवण क्षमता यांनी तपासणी तरी कधी केली ? असा प्रश्न शेतकरी पांडुरंग पाटिल यांनी विचारला आहे.
विशेष म्हणजे या शेतकऱ्यांना बियाणे उपलब्धतेबद्दल विचारणा करण्यासाठी इतर शेतकऱ्यांचे सतत फोन येत असतात. त्यामुळे मात्र या शेतकऱ्यांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे.
Edited By - Puja Bonkile
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.