बातम्या

लोकलमध्ये फ्री वायफाय

सकाळ न्यूज नेटवर्क

 मुंबई: लोकलमध्ये प्रवास करताना तांत्रिक बिघाडामुळे मुंबईकरांचा खोळंबा होतो. अनेक वेळा लोकल प्रवास करताना इंटरनेटच्या समस्या उद्भवतात. यामुळे प्रवाशांच्या मनस्तापात आणखी भर पडते. मुंबईकरांना विना इंटरनेट सुविधा पुरवण्यासाठी मध्य रेल्वेने लोकल डब्यात वायफाय बसविण्याचा निर्णय घेतला.'घाटकोपर-विक्रोळी दरम्यान इंटरनेटला रेंज नसणे', 'ऑनलाइन कार्यक्रम पाहताना पारसिक बोगद्यात 'बफरचा' सामना करावा लागणे', या त्रासापासून मुंबईकरांची लवकरच सुटका होणार आहे. इंटरनेटविना मनोरंजन करण्यासाठी मध्य रेल्वेने 'कंटेट ऑफ डिमांड' अंतर्गत लोकलमध्ये वायफाय बसविण्याचा निर्णय घेतला. दिवाळीच्या मुहूर्तावर मुंबईकरांना ही सुविधा वापरता येणार आहे.एसटी महामंडळाने खासगी कंपनीशी करार करून एसटींमध्ये 'प्री-लोडेड' वायफाय कार्यान्वित केले. सुरुवातीचे काही महिने हे वायफाय सुरळीत काम करत होते. मात्र त्यानंतर मोबाइल कनेक्ट न होणे, वायफाय बंद पडणे अशा तक्रारी प्रवाशांनी केल्या. यामुळे अनेक बसमध्ये चालकामागील बाजूस असलेले 'प्री-लोडेड' वायफाय हे केवळ शोभेसाठी उरले आहे.
  मध्य रेल्वेवरील १६५ लोकलमध्ये वायफाय बसविण्याचा निर्णय घेण्यात आला. यात प्री-लोडेड चित्रपट, मालिका आणि गाणी यांचा समावेश असेल. याचा वापर करण्यासाठी प्रवाशांना केवळ मोबाइल वायफाय सुरू करणे गरजेचे आहे. वायफाय लॉगइन केल्यानंतर प्रवाशांना 'प्री-लोडेड' माहिती मोबाइलवर पाहायला मिळेल. यामुळे प्रवाशांच्या इंटरनेट डेटाची देखील बचत होईल, अशी माहिती अधिकृत रेल्वे अधिकाऱ्यांनी दिली. लोकलमध्ये प्री-लोडेड वायफाय अंतर्गत केवळ इंग्रजी नव्हे तर प्रादेशिक भाषांमधील लोकप्रिय कार्यक्रम देखील पाहायला मिळतील. यात मराठी आणि हिंदी भाषेचा देखील समावेश असेल. ठराविक काळानंतर वायफायमधील कंटेट अपडेट करण्यात येईल, असे रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले.

सध्या लोकलमध्ये वायफाय बसविण्याचे काम सुरू आहे. ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यात या सुविधांचा प्रवाशांना लाभ घेता येईल, असे रेल्वे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. प्री-लोडेड वायफायसाठी मध्य रेल्वेने खासगी कंपनीबरोबर पाच वर्षांचा करार केला असून या करारानुसार मध्य रेल्वेच्या तिजोरीतही लाखो रुपयांची भर पडणार आहे. या सुविधेमुळे तांत्रिक बिघाड, मेल-एक्स्प्रेसला जाण्यासाठी लोकल थांबवणे अशा त्रासामुळे खोळंबलेल्या प्रवाशांना काहीअंशी नक्कीच समाधान मिळेल, असा विश्वास रेल्वे अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.


Web Title mumbai local train coaches to soon have wi fi hotspots
 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Food Poisoning: रेल्वेतील अंडा बिर्याणीमधून विषबाधा.. ४० हून अधिक प्रवासी रुग्णालयात; नेमकं काय घडलं?

Sleeping Problem : झोपेच्या कमतरतेमुळे जडू शकतात गंभीर आजार, शांत झोप लागण्यासाठी हे उपाय करुन पाहा

Santosh Juvekar Post : संतोष जुवेकरचा फोटो थेट हेअर सलूनच्या बोर्डावर, अभिनेत्याने सांगितला बालपणीचा 'तो' किस्सा

Dhananjay Munde News| राष्ट्रवादीने आबा पाटलांना मुख्यमंत्री का नाही केले? धनंजय मुंडे यांचा सवाल

Solapur Politics: शरद पवारांचे निकटवर्तीय देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला, सोलापूरमध्ये नेमकं घडतंय तरी काय?

SCROLL FOR NEXT