बातम्या

भारतीय क्रिकेट संघ लष्कराची टोपी घालून उतरणार

सकाळ न्यूज नेटवर्क

रांची : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसऱ्या सामन्यात भारतीय क्रिकेट संघ पुलावामा हल्ल्यात हुतात्मा झालेल्या जवानांना श्रद्धांजली देण्यासाठी भारतीय लष्कराची टोपी घालून उतरणार आहे. नाणेफेकीपूर्वी भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीने संघातील सर्व खेळाडूंना या टोप्यांचे वाटप केले. 

बीसीसीआयतर्फे दरवर्षी भारतीय लष्कराला मानवंदना देण्यासाठी एक सामना खेळण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले. ही कल्पना धोनी आणि कोहलीने दिली आहे. तसेच या सामन्याचे संपूर्ण मानधन टीम इंडिया हुतात्मा जवानांच्या कुटुंबीयांना देणार असल्याची घोषणा कोहलीने केली आहे. 

भारताने तिसऱ्या सामन्यात नाणेफक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. या सामन्यात विजय मिळवून मालिका खिशात घालण्याच्या इराद्यानेच भारतीय संघ मैदानावर उतरेल. तिसऱ्या सामन्यापासून संघात परतलेल्या भुवनेश्वर कुमारला अंतिम संघात स्थान दिले जाईल अशी अपेक्षा होती मात्र, भारतीय संघात कोणताही बदल करण्यात आलेला नाही.

Web Title: Indian team to wear special caps for indian army

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maval Lok Sabha : मावळ लोकसभेत मविआ उमेदवाराकडून अजित पवारांना वाकून नमस्कार; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

Nashik Election: मोठी बातमी! महंत अनिकेत शास्त्री BJPकडून लोकसभा लढवणार? शास्त्रींची पहिली प्रतिक्रिया 'साम'वर EXCLUSIVE

Sankarshan Karhade Poem | "तुम्ही कितीही बदला पक्ष...", कविता ऐकाच!

Mumbai Mega Block News: लोकल प्रवाशांनो, कृपया इथं लक्ष असू द्या! रविवारी नेमका कोणकोणत्या मार्गावर मेगाब्लॉक? जाणून घ्या सविस्तर

Summer Tips: उन्हामुळे चेहरा काळवंडलाय? फॉलो करा या 5 टिप्स

SCROLL FOR NEXT