Monsoon
Monsoon 
बातम्या

येत्या 24 तासात मान्सून केरळात दाखल होणार

अक्षय कस्पटे

नवी दिल्ली :  येत्या 24 तासात म्हणजेच 31   मी पर्यंत मान्सून केरळमध्ये दाखल होणार आहे. त्यानंतर 5 जून पर्यंत  पर्यंत  मान्सून गोव्यात Goa  आणि त्यानंतर काही दिवसातच महाराष्ट्रात दाखल होईल, अशी माहिती भारतीय  खात्याचे शास्त्रज्ञ राहुल. एम यांनी मॉन्सूनची माहिती दिली. (The monsoon will arrive in Kerala in the next 24 hours) 

  • 24  तासात मान्सून केरळात दाखल होणार 

शास्त्रज्ञ  एम. राहुल यांनी मच्छीमारांना पुढील पाच दिवस समुद्रात न जाण्याचा इशारा दिला आहे. स्थानिक हवामानाच्या स्थितीवर मान्सूनचे  केरळातून गोव्यात  आगमन होत असते. त्यामुळे सध्याच्या हालचाली पाहता मच्छीमारांनी समुद्रात जाऊ नये, असा इशारा हवामान विभागाच्या वतीने देण्यात आला आहे.  हवामानशास्त्रीय गणितानुसार यंदा मान्सून वेळेच्या अगोदरच येणार आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून केरळमध्ये 1 जूनपासून मान्सून पाऊस सुरू होतो, परंतु अलिकडच्या काळात त्याची वेळ बदलली असून केरळात मॉन्सून उशिराने दाखल होत आहे.  परंतु यावर्षी केरळमध्ये मान्सूनच्या वेळेच्या एक दिवस आधीच म्हणजेच  31 मे रोजीच केरळात दाखल होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तथापि, मालदीव-कोमोरिन भागातील काही भागात मान्सून वेगवान वेगाने वाटचाल करीत असून तो बंगालच्या उपसागरात पोहोचला आहे. आता मान्सून लवकरच दक्षिण पूर्व आणि पूर्वेकडील मध्य भागात पोहोचेल. असेही हवामान खात्याने म्हटले आहे. 

  • महाराष्ट्रात 2 जून पासून पावसाची शक्यता 

तर महाराष्ट्रात उद्यापासून मुंबई, पुणे, कोकणसह महाराष्ट्रातील बर्‍याच ठिकाणी मान्सूनपूर्व पाऊस सुरू होण्याची शक्यता पुण्याच्या हवामान खात्याने वर्तविली आहे. पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहणाऱ्या वार्‍यामध्ये आर्द्रता वाढली आहे. त्यामुळे येत्या चार दिवसात  कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात पाऊस पडण्याची शक्यता असून 2 जूनपासून राज्यात सर्वत्र मान्सूनपूर्व पाऊस सुरू होण्याची शक्यता पुणे हवामान विभागाने वर्तवली आहे.  त्याचबरोबर, पुणे शहरात शनिवारी सुमारे तीन तास मुसळधार पाऊस पडला. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात पावसाळ्यासाठी वातावरणनिर्मिती झाली आहे. आज किंवा उद्या केरळमध्ये मान्सून दाखल होईल. आणि 9-10 जून दरम्यान मान्सूनच्या महाराष्ट्रात दाखल होण्याची शक्यता आहे.  तर 15-20  जून पर्यंत संपूर्ण महाराष्ट्रात मान्सूनला सुरुवात होईल.  

  • तौक्ते आणि यास चाक्रीवादळाचा मान्सूनवर परिणाम    

दरम्यान,  तौक्ते आणि यास चाक्रीवादळाचा परिणाम मॉन्सूनवरही झाला आहे. केरळच्या किनारपट्टी भागात गेल्या सात दिवसांपासून मध्यम ते जोरदार स्वरूपाचा  पाऊस पडत आहे. या चाक्रीवादळांमुळे देशात मॉन्सूनसाठी पोषक  स्थिती निर्माण झाली आहे. दक्षिण भारतातील एर्नाकुलम, पठाणमथिट्टा, कोट्टायम, इडुक्कीसह दक्षिण भारतातील इतर जिल्ह्यांमध्ये गेल्या24 तासांपासून सतत पाऊस पडत आहे, तर तिरुवनंतपुरममध्ये ११ मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे. देशातील इतर राज्यातही मान्सूनसाठीपोषक वातावरण निर्मिती झाली आहे. मध्य प्रदेश, महाराष्ट्र, बिहार या राज्यांत मान्सूनपूर्व वातावरणामुले  काही ठिकाणी जोरदार गडगडाटी वादळ व हलका पाऊस झाला आहे.  तर, हवामानविषयक माहिती देणारी खासगी हवामान संस्था स्कायमेट वेदरने  मुंबई आणि महाराष्ट्रातील जवळपासच्या भागातही हवामानात बदल झाले असून काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडत असल्याची माहिती दिली आहे.

Edited  By - Anuradha  Dhawade 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IPL 2024 Playoffs: मुंबईच्या पराभवानं दिल्लीचा प्लेऑफमध्ये जाण्याचा मार्ग मोकळा! वाचा कसं असेल समीकरण

Today's Marathi News Live: PM मोदींची उद्या पुण्यात सभा; भाजपकडून जोरदार तयारी सुरू

Buldhana Accident: अंत्यसंस्कारावरून परतणाऱ्या रिक्षाला ट्रकची जोरदार धडक; ६ जणांची प्रकृती गंभीर

Kitchen Tips: साबण आठवड्यातच संपतो ?; फॉलो करा 'या' टीप्स

MI Playoffs Scenario: मुंबई इंडियन्सला अजूनही प्लेऑफमध्ये जाण्याची संधी! कसं असेल समीकरण?

SCROLL FOR NEXT