Shankarpali Recipe: दिवाळीला 'ही' सोपी ट्रिक वापरुन घरच्या घरी झटपट बनवा तोंडात विरघळणाऱ्या खुसखुशीत शंकरपाळ्या

Shruti Vilas Kadam

साहित्य तयार करा

२ कप मैदा, अर्धा कप साखर, ३ ते ४ चमचे तूप, अर्धा कप दूध, चिमूटभर मीठ आणि तळण्यासाठी तेल घ्या.

Shankarpali Recipe | yandex

साखर दुधात विरघळवा

दूध कोमट करून त्यात साखर घाला. साखर पूर्णपणे विरघळेपर्यंत चमच्याने ढवळा. दूध खूप गरम नसावे.

Shankarpali Recipe | google

मैदा आणि तूप एकत्र करा

एका भांड्यात मैदा, तूप आणि चिमूटभर मीठ घालून चांगले एकत्र करा. त्यानंतर साखर विरघळवलेले दूध थोडे थोडे घालत पीठ मळा.

Shankarpali Recipe | Yandex

पीठ मळून ठेवा

घट्ट आणि गुळगुळीत पीठ मळून घ्या. पीठ झाकून १५ ते २० मिनिटे बाजूला ठेवा. यामुळे लाटणे सोपे होते.

Shankarpali Recipe | Google

शंकरपाळीचे आकार कापा

पिठाचा गोळा घेऊन जाडसर पोळी लाटा. सुरी किंवा कटरच्या मदतीने चौकोनी अथवा डायमंड आकाराचे तुकडे कापून घ्या.

Shankarpali Recipe

मंद ते मध्यम आचेवर तळा

कढईत तेल गरम करा. शंकरपाळी थोड्या थोड्या प्रमाणात घालून मंद ते मध्यम आचेवर सोनेरी होईपर्यंत तळा. तेल खूप गरम असल्यास बाहेरून रंग येईल, पण आतून कच्ची राहू शकते.

Shankarpali Recipe

थंड करून हवाबंद डब्यात भरा

तळलेली शंकरपाळी टिश्यू पेपरवर काढा. पूर्ण थंड झाल्यानंतर हवाबंद डब्यात साठवा. अशा प्रकारे शंकरपाळी खुसखुशीत राहण्यास मदत होते.

Shankarpali

Coconut Laddu Recipe: दिवाळीचा फराळ करायला सुरुवात झाली? मग झटपट बनवा हेल्दी चविष्ट नारळाचे लाडू; वाचा रेसिपी

Coconut Laddu Recipe | Saam Tv
येथे क्लिक करा