MLA Abhimanyu Pawar demanding to Pay farmers for their farm labor from MREGS 
MLA Abhimanyu Pawar demanding to Pay farmers for their farm labor from MREGS  
बातम्या

शेतकऱ्यांना स्वतःच्या शेतातील श्रमाला MREGS मधून वेतन द्या: अभिमन्यू पवार

दीपक क्षीरसागर

लातूर : राज्यातील State शेतकरी Farmers दरवर्षी निसर्गाच्या दुष्टचक्रात भरडून जात आहे. बेभरवशाचा पाऊस, वाढता उत्पादन खर्च व हमी नसलेल्या शेतमाल यामुळे आर्थिक दुष्ट चक्र शेतकऱ्यांची पाठ सोडत नाही. या शेतकऱ्यांना स्वतःच्या शेतात केलेल्या कष्टाला MREGS मधून रोजगार द्यावा अशी मागणी आमदार अभिमन्यू पवार Abhimanyu Pawar यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार Ajit Pawar यांच्याकडे केली आहे. MLA Abhimanyu Pawar demanding to Pay farmers for their farm labor from MREGS 

राज्यातील शेतकरी हा निसर्गाच्या अवकृपेने त्रासलेले आहेत वाढता उत्पादन खर्च, हमी नसलेला बाजारभाव यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. मराठवाड्यात अतिवृष्टी तर कधी दुष्काळ Drought यामुळे शेती उत्त्पन्न घटत आहे. यातच संसाराचा ताळमेळ भागवण्यासाठी अनेकदा कर्ज काढावी लागत असल्याने शेतकरी आत्महत्या हा दरवर्षीचा चिंतेचा विषय आहे.

गत काळात केंद्र व राज्य सरकारने Government कर्जमाफी केली परंतु ती सुद्धा तोकडी पडली आहे. भविष्यात शेतकऱ्यांना स्वतःच्या शेतात मशागतीपासून लागवड व पीक काढणी पर्यंत केलेल्या कष्टाला राज्याच्या MREGS योजनेतून मजुरी दिल्यास नक्कीच शेतकऱ्यांना दरमहा चार पैसे उपलब्ध होतील, यातून घरखर्च  व अन्य खर्चाला शासकीय हातभार लागल्यामुळे अर्थचक्राला गती येऊन राज्यातील शेतकरी समृद्ध होईल.

 हे देखील पहा - 

यासाठी राज्य शासनाने जो शेतकरी स्वतः शेतात कष्ट करतो त्याच शेतकऱ्यांना MREGS अंतर्गत जॉबकार्ड करून त्यांना मजुरी द्यावे. अशी मागणी औसा येथील भाजपा BJP आमदार अभिमन्यू पवार यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली आहे. 

Edited By-Sanika Gade

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Narendra Modi: PM मोदींची आज पुण्यात सभा, शहरातील अनेक रस्ते राहणार बंद; वाहतुकीसाठी पर्यायी मार्ग कोणते?

Arvind Kejriwal: अरविंद केजरीवाल यांना तुरुंगात दहशतवाद्यांसारखी वागणूक दिली जातेय; आम आदमी पक्षाचा गंभीर आरोप

Amit Shah Fake Video: अमित शहांच्या भाषणाचा बनावट व्हिडीओ व्हायरल; भाजप नेते आक्रमक, पोलिसांत गुन्हा दाखल

Horoscope Today: आजचे राशिभविष्य, 'या' राशींच्या लोकांसाठी सोमवार ठरणार त्रासदायक; तुमची रास यात नाही ना?

Kalyan Lok Sabha: कल्याण लोकसभा मतदारसंघात राज ठाकरेंची सभा झाली तर आनंदच: श्रीकांत शिंदे

SCROLL FOR NEXT