बातम्या

‘सकाळ’ गणेश दर्शन स्पर्धा; सहभागी व्हा, आकर्षक बक्षिसे मिळवा..

सकाळ न्यूज नेटवर्क

नवी मुंबई : ‘सकाळ’ माध्यम समूहाच्या वतीने सार्वजनिक व घरगुती गणेशोत्सव दर्शन स्पर्धा घेण्यात येणार आहे. पर्यावरणपूरक विषयांवर माहिती सादर करणाऱ्या सार्वजनिक व घरगुती गणेशोत्सव स्पर्धा ही गणेशभक्‍तांसाठी पर्वणीच ठरणार आहे. या कार्यक्रमाचे प्रायोजन इन्फ्राटेक प्रॉपर्टीज असून सहप्रायोजक एटी ऑईल व ऑटोटेक आहेत. 

स्पर्धा सार्वजनिक व घरगुती अशा दोन गटांत होणार आहे. श्री देखाव्यांमध्ये प्लास्टिकमुक्‍त अभियानांतर्गत पर्यावरण आदी सामाजिक विषयांवर माहिती सादर करणे आवश्‍यक असून स्पर्धेत विनाशुल्क सहभाग घेता येणार आहे. यासाठी स्पर्धकास १ सप्टेंबरपर्यंत सायंकाळी ५ वाजेपर्यंत बेलापूर सीबीडी येथील ‘सकाळ’च्या कार्यालयात प्रवेशिका जमा करावी लागणार आहे. स्पर्धक मंडळाने स्पर्धेचा बॅनर लावणे आवश्‍यक आहे. 

दिलेल्या निकषांच्या आधारे विजेत्या मंडळांची निवड करण्यात येणार असून स्पर्धेत सर्वोत्तम ठरणाऱ्या सार्वजनिक मंडळास २१,००१ रुपये, चषक व सन्मानपत्र देऊन गौरवण्यात येणार आहे. तसेच घरगुती स्पर्धेत सर्वोत्तम ठरणाऱ्या स्पर्धकास ७,५०१ रुपये, चषक व सन्मानपत्र देण्यात येणार आहे. तसेच सार्वजनिक मंडळ स्पर्धेत उत्कृष्ट मंडळास १५,००१ रुपये, उत्तम ठरणाऱ्या मंडळास ११,००१ रुपये; तर उत्तेजनार्थ ठरणाऱ्या मंडळास १,००१ रुपये देण्यात येणार आहेत. 

घरगुती गणेशोत्सव दर्शन स्पर्धेत उत्कृष्ट ठरणाऱ्या स्पर्धकास ५,००१ रुपये, उत्तम स्पर्धकास २,१०१ रुपये; तर उत्तेजनार्थ स्पर्धकास ५०१ रुपये देण्यात येणार आहेत. तसेच सहभागी स्पर्धकांना चषक व सन्मानपत्र देण्यात येईल. अधिक माहितीसाठी सकाळ भवन, प्लॉट न. ४२ बी, बेलापूर ९६१९२३२४९५ येथे संपर्क साधावा.

Webtitle : marathi sakal ganeshotsav competition 2019 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sanjay Raut: सांगलीत भाजपचा अधिकृत अन् एक अनधिकृत उमेदवार; संजय राऊतांचा विशाल पाटील यांना टोला

Acidity Tips: वारंवार पित्त खवळंतय?हे घरगुती उपाय ठरतील रामबाण

Today's Marathi News Live : राम सातपुते यांची सोशल मीडियावर बदनामी; काँग्रेस कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल

Voter Awareness Programme: मतदान करा हाे... मतदान करा..., मावळात वासुदेव करताहेत मतदारांची जागृती

Teeth Whitening Tips : पिवळेपणा जाऊन दात मोत्यासारखे चमकतील; आठवडाभर ट्राय करा 'या' पेस्ट

SCROLL FOR NEXT