बातम्या

मतदान न करण्याचाही विक्रम विराटच्या नावावर?

सकाळ न्यूज नेटवर्क

नवी मुंबई : ज्याच्या नावावर क्रिकेटमध्ये अनेक विक्रम आहेत, तो विराट कोहली आता एका नव्या विक्रमावरही आपलं नाव कोरण्याची शक्यताय. 
पण कदाचित हा विक्रम आपल्या नावावर होणं विराट कोहलीला आवडणार नाही. नेमका असा कोणता विक्रम विराट 
कोहलीच्या नावावर होण्याची  शक्यताय, हे तुम्हाला कळलं, तर तुम्हीही चकीत व्हाल. 

विराट कोहलीने क्रिकेटच्या मैदानावर विराट विक्रमांना गवसणी घातली. विराट सध्या कोणताही सामना खेळला, 
तर किमान एक तरी विक्रम स्वतःच्या नावावर करतोच. गेल्या काही दिवसांत विराटने अनेक रेकॉर्ड मोडलेत. 
काही नवे रेकॉर्ड केलेतही. अशातच आता एक नवा रेकॉर्ड विराट इच्छा नसतानाही करण्याच्या तयारीत आहे. 
हा रेकॉर्ड कदाचित विराट कोहलीला आवडणार नाही. पण हा रेकॉर्ड होवू नये, यासाठी आता विराटलाच धडपड
करावी लागणार आहे. 

त्याचं झालं असं, की विराट कोहलीला लोकसभेला मतदान करता आलं नव्हतं. मतदार यादीत नावंच नसल्यानं
विराटला मतच देता आलं नाही. टीम इंडियाचं नेतृत्त्व करणारा विराट लोकसभेला लोकांना मतदान करण्याचं आवाहन करत
होता. पण त्यावेळी त्यालाच मतदान करता आलं नव्हतं. अशातच आता महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुका आहेत. 21 तारखेला 
विधानसभेचं मतदान पार पडेल. पण या दिवशीही विराट कोहलीला मतदान करता येणार नसल्याची चर्चा आहे. 

विराट कोहलीने वरळीत घर घेतलंय. मात्र वरळीच्या मतदार संघातील मतदार यादीत विराट कोहलीचं 
नावंच आलेलं नाही. त्यामुळे विराट कोहलीला मतदान करता येणार नाहीये. विराट कोहलीने दिलेल्या पत्त्यावर निवडणूक अधिकारी पोहोचले. 
मात्र तिथे त्यांना विराट सापडलाच नाही. ई-मेलवरही त्याने काही उत्तर दिलं नाही. घरच्या पत्त्यावरही कुणीच नाही. इतकंच काय, तर
फोननंबरही चुकीचाच. असं सगळं असताना, मतदार यादीत विराटचं नाव आलं असतं, तरच नवल. पत्त नसल्यानं विराट कोहलीच्या नावाचा मतदार
यादीतून पत्ता कट झाला. 

आता यंदाही विराट फक्त ट्वीटरवरुन लोकांना मतदानाचं आवाहन करेल. यावरुन कदाचित तो ट्रोलही होईल. पण महत्त्वाचं म्हणजे 
मतदानाच्या दिवसाची सार्वजनिक सुट्टी विराट अनुष्कासोबत एन्जॉय करेल, यात काही शंका नाही

Web Title :: Virat Kohli Can't Vote For Vidhansabh From Worli

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shantigiri Maharaj Nashik News | नाशिकमधून गावितांनी घेतली माघार, शांतिगिरी अजूनही ठाम

ED Raid: मंत्र्याच्या PA कडे सापडलं कोट्यवधींचं घबाड; पैशांचा नुसता ढीग, नोटा मोजून ईडी अधिकारीही थकले

Today's Marathi News Live : रत्नागिरी-सिंधुदूर्ग लोकसभा मतदारसंघातील प्रशासन मतदानासाठी सज्ज

Mumbai Water Lake Level : मुंबईकरांवर पाणीकपातीचं सावट; शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या ७ तलावांमध्ये सध्या किती पाणीसाठा?

Jharkhand ED Raid News | झारखंडमध्ये ED ची मोठी कारवाई, कोट्यवधींची रोकड जप्त

SCROLL FOR NEXT