बातम्या

उजनी धरण भरले 100 टक्के

सकाळ न्यूज नेटवर्क

पंढरपूरः दुष्काळी सोलापूर जिल्हयाची तहान भागवणारे उजनी धरण आज सकाळी 12:00 वाजता 117 टीएमसी क्षमतेने 100% भरले आहे. पुणे आणि दक्षिण अहमदनगरच्या भागात पाऊसाचा जोर कायम आहे. आता सोलापूर जिल्हयातील अनेक गाव आणि शहरांचा पिण्याच्या पाण्याचा आणि शेतीच्या साठी लागणार्या पाण्याचा प्रश्न सुटला आहे.

सोलापूर जिल्हयासह उस्मानाबाद, पुणे आणि अहमदनगर जिल्हयातील काही तालुक्यांना पिण्याच्या पाण्यासाठी उपयोग होणार.सध्या शेती साठी उजनीच्या कालव्यातून आणि बोगद्यातून शेतीसाठी पाणी सोडल आहे.

दरम्यान, पुणे जिल्ह्यात पावसाचा जोर पुन्हा वाढला आहे. त्यामुळे धरणात येणारे पाणीही वाढत आहे. ते पाणी वाढून धरणातून भीमा नदीमध्ये एकदम मोठ्या प्रमाणात पाणी सोडण्यापेक्षा कालपासून थोड्या प्रमाणात धरणातून भीमा नदीमध्ये पाणी सोडण्यास सुरवात केली आहे.

काल सायंकाळी सहा वाजता धरणातून एक हजार 600 क्‍युसेकने वीजनिर्मितीसाठी पाणी सोडले आहे. याशिवाय कालव्यातून तीन हजार 200, बोगद्यातून 900 क्‍सुसेकनेही पाणी सोडले जात आहे. आज सकाळी धरणातून भीमा नदीमध्ये पुन्हा अडीच हजार क्‍युसेकने पाणी सोडण्यात येणार असल्याचेही पाटबंधारे विभागाच्या सूत्रांनी सांगितले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Boycott Election : मेणबत्ती पेटवत मतदान न करण्याची घेतली शपथ; कळमदरी ग्रामस्थांचा लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार

Solapur Breaking: भाजप उमेदवार राम सातपुतेंची सोशल मीडियावर बदनामी; कॉंग्रेस कार्यकर्त्यावर गुन्हा दाखल

Technology Tips: एसीची कूलिंग घरबसल्या वाढवायची आहे? फॉलो करा 'या' सोप्या ट्रिक्स

Raigad News: अनिल नवगणे यांच्या कारवर हल्ला प्रकरण, भरत गोगावलेंच्या मुलासह २५ ते ३० जणांविरोधात गुन्हा

Life Success Tips : शहाणे असाल तर आयुष्यातील 'या' गोष्टी कधीच कुणालाही सांगू नका, अन्यथा पश्चाताप होईल

SCROLL FOR NEXT