बातम्या

तुर्भे ते खारघर भुयारी मार्ग होणार : एकनाथ शिंदे

सकाळ न्यूज नेटवर्क

ठाणे-पनवेल-एक्सप्रेस वे - जेएनपीटी या भागातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी शासन कार्यरत आहे. यासाठी प्रकल्प मेसर्स स्टुप कन्सलल्टंट प्रा.लि. यांनी या प्रकल्पाची पूर्व सुसज्जता तपासण्यासाठी त्यांची नेमणूक केली.

मुंबई : मंत्रिमंडळ पायाभूत समितीने सायन-पनवेल महामार्गावरील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी पर्यायी मार्ग म्हणून तुर्भे ते खारघर भुयारी मार्ग करण्याचा निर्णय घेतला आहे.  ठाणे-पनवेल वाहतूक, जेएनपीटीकडे जाणारी वाहतूक यांची कोंडी होत असल्याने ती सोडविण्यासाठी शासन सकारात्मक असून त्याबाबत जलद गतीने कार्यवाही सुरू असल्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधानसभेत सांगितले.

तुर्भे ते खारघर या भुयारी मार्गाच्या कामाबाबत सदस्य गणेश नाईक यांनी प्रश्न उपस्थित केला होता. यास उत्तर देताना मंत्री श्री.शिंदे बोलत होते.

श्री.शिंदे म्हणाले, ठाणे-पनवेल-एक्सप्रेस वे - जेएनपीटी या भागातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी शासन कार्यरत आहे. यासाठी प्रकल्प मेसर्स स्टुप कन्सलल्टंट प्रा.लि. यांनी या प्रकल्पाची पूर्व सुसज्जता तपासण्यासाठी त्यांची नेमणूक केली. प्रधान सचिव यांच्या अध्यक्षतेखाली संबंधित प्रकल्पातील नऊ आराखड्यांचा अभ्यास करण्यात आला. त्यापैकी एका प्रकल्पास मान्यता देण्यात आली आहे. या प्रकल्पासाठी एमआयडीसी, एमएसआरडीसीने, सिडको यांनी ६०० कोटी आणि उर्वरित ६२२ कोटी कर्जरूपाने उभे करण्यात येणार आहे. हा प्रकल्प जलद गतीने पूर्ण करण्यासाठी सर्व सोयींनी युक्त अहवाल जलद गतीने सादर करण्यात येणार असल्याची माहितीही मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.

web title : marathi news From Turbhe to Kharghar subway will be: Eknath Shinde

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chandrahar Patil : पृथ्वीराज पाटील यांचा विधानसभेत पराभव कोणी केला?; चंद्रहार पाटील यांनी केला गौप्यस्फोट

Drinking Milk: रात्री झोपण्यापूर्वी दूध का पिऊ नये?

Covid Vaccine Certificate: कोविड लसीकरण प्रमाणपत्रावरील PM मोदींचा फोटो गेला कुठं?, समोर आलं कारण

Today's Marathi News Live : पृथ्वीराज पाटील यांचा विधानसभेत कसा पराभव झाला ते संपूर्ण सांगली जिल्ह्याला माहिती, चंद्रहार पाटील यांचा रोख कोणाकडे?

Sleeping Promblem: रात्री चांगली झोप लागत नाही, आहारात करा बदल

SCROLL FOR NEXT