बातम्या

युतीचा पोपट पिंजर्‍यात; 23-25चे जागावाटपाचे सूत्र

सकाळ न्यूज नेटवर्क

मुंबई- स्वबळाचा निर्धार, पटक देंगेचा इशारा, आम्हीच मोठा भाऊची गर्जना असे इशारे आणि घोषणा गेली चार वर्ष महाराष्ट्रातल्या जनतेने अनुभवल्या. सत्तेत राहुनही शिवसेनेने कायम विरोधी पक्षाची भूमिका निभावली. सामनातून शिवसेनेने जोरदार प्रहार केलेत. तर भाजपनेही शिवसेनेकडे अखेर दुर्लक्ष केलं. अशा वातावरणात महाराष्ट्रात चौरंगी लढत होणार अशी शक्यता असताना अखेर भाजप आणि शिवसेनेची युती झाली आहे. आज यावर मुंबईत पत्रकार परिषद घेऊन दोन्ही पक्षाकडून शिक्कामोर्तब करण्यात आले.

2019 ची लोकसभा आणि त्यानंतरची विधानसभा निवडणूक दोनही पक्ष एकत्र लढणार असल्याची माहिती या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. उद्धव ठाकरे यांच्या भेटीआधी सोफिटेल हॉटेलमध्ये अमित शहांनी मुख्यमंत्र्यांसह केंद्रीय मंत्री पीयूष गोयल, प्रकाश जावडेकर यांच्यासह चर्चा केली. त्यानंतर ही नेते मंडळी युतीच्या चर्चेसाठी मातोश्रीवर पोहोचली. 

उद्धव यांनी मातोश्रीवर शिवसेनेच्या नेत्यांची बैठक घेतली. या बैठकीला संजय राऊत, चंद्रकांत खैरे, मनोहर जोशी, एकनाथ शिंदे, दिवाकर रावते, सचिव मिलिंद नार्वेकर उपस्थित होते. युती झाल्यानंतर नेमकी रणनिती काय असणार, जनतेसमोर कोणते मुद्दे घेऊन जाणार, याबद्दल या दोन्ही बैठकांमध्ये चर्चा झाल्याचं समजतं. गेल्या पाच वर्षांमध्ये शिवसेनेनं सातत्यानं मोदी सरकारवर टीका केली आहे. याशिवाय स्वबळाचा नारादेखील उद्धव यांनी दिला होता, त्यामुळे आता शिवसेना मतदारांना कशी सामोरी जाणार, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

Web Title: marathi news shivsne bjp are once again together bjp will contest 25 seats and shivsea will contest 23 seats 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदे यांना मारण्याचा कट रचला होता.. शिंदे गटाच्या नेत्याचा खळबळजनक आरोप

Ahmednagar Lok Sabha: ओबीसींनी ओबीसीलाच सहकार्य करा, भर चौकात झळकले बॅनर्स; राजकीय वर्तुळात खळबळ

Curd: विरजण नसतानाही घरच्याघरी दही लावायचं? मग जाणून घ्या 'या' सोपी पद्धत

IPL 2024 Playoffs: मुंबईच्या पराभवानं दिल्लीचा प्लेऑफमध्ये जाण्याचा मार्ग मोकळा! वाचा कसं असेल समीकरण

Today's Marathi News Live: PM मोदींची उद्या पुण्यात सभा; भाजपकडून जोरदार तयारी सुरू

SCROLL FOR NEXT