बातम्या

संजय राऊतांनी मोदींना टोला देत विधेयकाबाबत स्पष्ट केली भूमिका

सकाळ न्यूज नेटवर्क

नवी दिल्ली : नागरिकत्व दुरुस्ती विधेयकावर राज्यसभेत आमची भूमिका वेगळी असू शकते. शिवसेना कधीच कोणाच्या दबावात येऊन काम करत नाही. आम्हाला राष्ट्रभक्ती कोणी शिकवू नये, असे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे.

केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारला लोकसभेत नागरिकत्व दुरुस्ती विधेयक मंजूर करून घेण्यात यश आले होते. पण, आज हे विधेयक राज्यसभेत सादर करण्यात येणार आहे. राज्यसभेत सरकारला इतर पक्षांची गरज पडणार आहे. त्यामुळे लोकसभेप्रमाणे शिवसेना भाजपला राज्यसभेत मदत करेल की नाही हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. कारण, महाराष्ट्रात शिवसेनेने भाजपची साथ सोडून, काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता. शिवसेनेच्या लोकसभेतील भूमिकेनंतर त्यांच्यावर टीका होत असताना राऊत यांनी राज्यसभेतील पक्षाच्या भूमिकेबाबत वक्तव्ये केले आहेत.

संजय राऊत म्हणाले, की राज्यसभेत सत्ताधारी आणि विरोधकांना आमची गरज आहे. आम्ही मानवतेच्या हिताची भूमिका घेऊ. विधेयकाबाबत काही प्रश्न आहेत. सरकारने आमच्या शंकांच निरसन करावे. आम्हाला देशभक्तीचे धडे कोणाकडून घेण्याची गरज नाही. मानवतेला कोणताही धर्म नसतो. राष्ट्रभक्ती शिकण्यासाठी कोणत्याही शाळेत शिकविली जात नाही. चर्चेनंतर आमची भूमिका स्पष्ट करू. विधेयकाबाबत आमचे काही प्रश्न आहेत. 

Web Title: Shiv Sena MP Sanjay Raut speak on Citizenship Amendment Bill

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Premachi Goshta : प्रेमाच्या गोष्टीमध्ये नवा ट्विस्ट; माधवीच्या अपघाताला कोण कारणीभूत?

Japan vs Mongolia: विश्वासच बसेना! ६ फलंदाज शून्यावर बाद ; स्कोअरबोर्ड पाहून डोकं चक्रावून जाईल

"आमच्या फुलाचं सौंदर्य खुललंय..."; 'लापता लेडिज' फेम अभिनेत्रीने Met Gala 2024 सोहळा गाजवला

Mumbai School News: मुंबईच्या प्रसिद्ध शाळेतील मुख्यध्यापिका पदावरून बडतर्फ; पॅलेस्टाइनवरील पोस्ट लाइक केल्याने कारवाई

Water Shortage : सीना कोळेगाव प्रकल्पात केवळ ८ टक्के पाणीसाठा; परंडा तालुक्यात सिंचनाचा प्रश्न गंभीर

SCROLL FOR NEXT