बातम्या

महाराष्ट्र आता अंधारात जाण्याची शक्यता , पाण्याअभावी कोयना प्रकल्प बंद

सकाळ न्यूज नेटवर्क

सातारा : दुष्काळी परिस्थितीतमुळे संकटात सापडलेला महाराष्ट्र आता अंधारात जाण्याची शक्यताही आहे. महाराष्ट्राची वीजवाहिनी मानल्या जाणाऱया कोयना जलविद्युत प्रकल्पातून होणारी वीजनिर्मिती आजपासून पूर्णपणे बंद झाली आहे. सातारा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आदेशानुसार धरणाच्या व्यवस्थापनाने हा निर्णय घेतला. याचा मोठा परिणाम महाराष्ट्रावर होण्याची शक्यता आहे.  

कोयना धरणातील पाणीसाठा दिवसेंदिवस कमी होत आहे. या पार्श्वभूमीवर सातारा सिंचन मंडळ आणि जिल्हाधिकाऱयांनी वीजनिर्मिती बंद करण्याचे आदेश दिले आहेत. 

महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी समजल्या जाणाऱ्या कोयना धरणातील वीजनिर्मिती धरणातील अत्यल्प पाणीसाठा याचा विचार करून आजपासून बंद करण्यात आली. सातारा येथील सिंचन मंडळ आणि जिल्हाधिकारी कार्यालयाने पुढील आदेश येईपर्यंत कोयनेतील वीजनिर्मिती पूर्णपणे बंद करावी असा आदेश कोयना धरणाच्या अधीक्षक अभियंत्यांना काल एका मेलद्वारे दिला होता. त्यामुळे आज दुपारी ही वीज निर्मिती बंद करण्यात आली.

सातारा जिल्ह्यात या वर्षी तीव्र दुष्काळी स्थिती आहे कोयना धरणात काल अखेरपर्यंत केवळ अकरा टीएमसी पाणीसाठा उपलब्ध होता.

गेल्या काही दिवसांपासून वीज निर्मितीसाठीच्या पाण्याची कपात करावी याबाबत साताऱ्याचे जिल्हाधिकारी कार्यालय आणि महानिर्मिती कंपनीची चर्चा सुरू होती. त्यानुसार जूनमध्ये कमीत कमी चार टीएमसी पाणीसाठा राखीव ठेवावा आणि उरलेल्या पाण्याचे नियोजन वीजनिर्मितीसाठी करावे असा निर्णय नुकताच झाला होता.

महानिर्मिती कंपनीनेही त्याला सकारात्मक प्रतिसाद दिला होता. मात्र जिल्हाधिकारी कार्यालयाने आजपासूनच पूर्णपणे वीजनिर्मिती बंद ठेवण्याचा आणि पुढील आदेश येईपर्यंत त्याची कार्यवाही करावी असा आदेश काढला आहे.

महानिर्मिती कंपनीची वीज निर्मितीची क्षमता 13602 मेगावॅट इतकी आहे. यापैकी 1956 मेगावॉट वीज निर्मिती कोयना जलविद्युत प्रकल्पातून होते. याचा अर्थ महाराष्ट्राची वीज निर्मितीची क्षमता सुमारे दोन हजार मेगावॉट अचानक कमी झाली आहे. परिणामी, येत्या काही दिवसात राज्याला अघोषित भारनियमनाला सामोरे जावे लागेल, अशी शक्यता आहे. 

Web Title: Maharashtra may face load shedding as Koyna hydro power project stopped

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Horoscope Today: आजचे राशिभविष्य, मेषसह ४ राशींसाठी ‘शनिवार’ भाग्याचा; फक्त 'या' गोष्टीची घ्या काळजी

Cibil Score: कमी झालेला सिबिल स्कोअर ७०० पार कसा कराल? 'या' टिप्स सुधारतील तुमचा स्कोअर

Ankita Lokhande: हृदयस्पर्शी कॅप्शनसह अंकिता लोखंडेने पतीसोबतचा रुग्णालयातील फोटो केला शेअर

Maharashatra Elction: कोकणात ठाकरे विरुद्ध ठाकरे लढाई; उद्धव आणि राज ठाकरेंच्या सभांचा झंजावात

Petrol वर नाही CNG वर धावणार Bajaj ची नविन बाईक, Platina पेक्षा देणार जास्त मायलेज

SCROLL FOR NEXT