बातम्या

Loksabha 2019 : साताऱ्यातील उदयनराजे अब्जाधीश उमेदवार

सकाळ न्यूज नेटवर्क

सातारा - राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सातारा लोकसभेचे उमेदवार उदयनराजे भोसले यांनी अर्जासोबत दिलेल्या प्रतिज्ञापत्रात ते अब्जाधीश असल्याचे दिसत आहे. त्यांच्याकडे 12 कोटी 31 लाख 84 हजारांची जंगम, तर एक कोटी 13 लाख नऊ हजार रुपयांची स्थावर मालमत्ता आहे. एक अब्ज 16 कोटी 35 लाखांची शेतजमीन आहे. त्यांच्याकडे 37 किलो सोने असून, त्यांची किंमत एक कोटी 33 लाख 75 हजार रुपये आहे. 

खासदार उदयनराजे भोसले यांनी 2017- 18 मध्ये एक कोटी 15 लाख 71 हजार रुपयांचे करप्राप्त उत्पन्न दर्शविले आहे. पत्नी दमयंतीराजे यांनी आठ लाख 72 हजार 774 रुपयांचे करप्राप्त उत्पन्न, तर हिंदू अविभक्त कुटुंब 16 लाख 13 हजार रुपयांचे करप्राप्त उत्पन्न दाखविले आहे. उदयनराजेंकडे 18 लाख, 15 हजार 850 रुपये, तर पत्नी दमयंतीराजे भोसले यांच्याकडे एक लाख 57 हजार 023 रुपये, तर अविभक्त कुटुंब म्हणून तीन लाख 25 हजार 691 रुपयांची रोकड आहे, तर विविध बॅंकांमध्ये उदयनराजेंच्या 29 लाख 76 हजार 166 रुपयांच्या ठेवी असून, पत्नी दमयंतीराजेंच्या नावे बॅंकेत 38 लाख 83 हजार 970 रुपये अविभक्त हिंदू कुटुंबांच्या नावे बॅंकेत 21 लाख 15 हजार रुपयांची रक्कम शिल्लक आहे. विविध शेअर्स, म्युच्युअल फंड आदींमध्ये उदयनराजेंच्या नावे एक कोटी 41 लाख 86 हजार रुपये गुंतविलेले आहेत, तर पत्नी दमयंतीराजेंच्या नावे बिटकॉनमध्ये चार लाखांची गुंतवणूक आहे. विविध संस्था, कंपनी व भागीदारी संस्थांना दिलेल्या रकमा आठ कोटी 16 लाख 54 हजार रुपयांच्या आहेत.

उदयनराजेंकडे 91 लाख 70 हजारांच्या चार अलिशान गाड्या आहेत. यात ऑडी, मर्सिडिज बेन्ज, इन्डिवर, मारुती जिप्सी या गाड्यांचा समावेश आहे, तर पत्नी दमयंतीराजेंच्या नावे पोलो ही चार लाखांची गाडी आहे.

उदयनराजेंकडे एक कोटी 33 लाख 75 हजारांचे 37 किलो सोने आहे, तर पत्नी दमयंतीराजेंकडे 32 लाख 98 हजारांचे विविध दागिने आहेत, तर हिंदू अविभक्त कुटुंबाकडे 23 लाख 61 हजारांचे दागिने आहेत. उदयनराजेंकडे एक अब्ज, 16 कोटी, 35 लाख 73 हजार रुपये किमतीची शेतजमीन असून, 18 कोटी 31 लाखांची बिगरशेती जमीन आहे, तसेच 26 लाख 37 हजारांच्या वाणिज्य इमारती, तसेच 22 कोटी 31 लाख 92 हजारांची निवासी इमारती अशी एकूण त्यांच्याकडे एक अब्ज 57 कोटी, 25 लाखांची संपत्ती आहे. उदयनराजेंवर 35 लाख 69 हजार रुपयांचे वैयक्तिक कर्ज आहे.

Web Title: Loksabha Election 2019 Udayanraje Bhosale Property

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mahayuti Politics News | महायुतीचं जागावाटप 24 तासात फायनल ?

Sanjay Raut : कोल्हापूरच्या गादीपुढे मोदी कोणीही नाहीत; संजय राऊतांची घणाघाती टीका

Maldives Travel : उन्हाळ्याच्या सुट्टीत फिरा मालदीवच्या बीचवर, इतका होईल खर्च

Clove Benefits: नियमित एक लवंग खाल्ल्याने होतो जबरदस्त फायदा

Sangli Loksabha: सांगलीच्या खेळीचे 'खलनायक' जयंत पाटील... माजी आमदार विलासराव जगताप यांचा गंभीर आरोप; राऊतांवरही निशाणा

SCROLL FOR NEXT