बातम्या

संभाजी भिडेंसह नऊ जणांवर गुन्हा

सकाळ न्यूज नेटवर्क

बेळगाव - शिवप्रतिष्ठानचे संभाजी भिडेंसह नऊ जणांविरोधात पोलिसांत शुक्रवारी (ता. १३) गुन्हा दाखल झाला. येळ्ळूरला यात्रेसाठी व कुस्ती मैदानासाठी परवानगी असताना तेथे म. ए. समितीचा प्रचार करून प्रक्षोभक भाषण केल्याचा ठपका ठेवत भरारी पथकाच्या अधिकाऱ्यांनी याबाबतची फिर्याद बेळगाव ग्रामीण पोलिसांत दिली. त्यानुसार हा गुन्हा दाखल झाल्याचे पोलिसांनी सांगितले.

गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये मारुती परशराम कुगजी, प्रदीप लक्ष्मण देसाई, विलास नंदी, बी. जी. पाटील, मधू पाटील, भोला पाखरे (सर्वजण रा. येळ्ळूर), किरण गावडे (सोमवार पेठ, टिळकवाडी) व दुधाप्पा बागेवाडी (रा. येळ्ळूर) यांचा समावेश आहे. बेळगाव दक्षिण विभागाचे निवडणूक भरारी पथकाचे अधिकारी एस. बी. नाईक यांनी याबाबतची फिर्याद दिली आहे. 
येळ्ळूरला चांगळेश्‍वरी, कलमेश्‍वर यात्रेनिमित्त गुरुवारी कुस्ती मैदान झाले. यावेळी संभाजी भिडेंना आमंत्रित करण्यात आले होते.

सध्या विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू आहे. परंतु, याचे भान न ठेवता भिडेंनी म. ए. समितीच्यावतीने मतदारांवर प्रभाव टाकण्यासाठी राजकारणाशी संबंधित आक्षेपार्ह व माजी आमदाराविरोधात प्रक्षोभक भाषण केले. याची दखल घेऊन निवडणूक अधिकाऱ्यांनी त्यांच्यावर गुन्हा दाखल केला. त्यांना बेळगावात आणून प्रक्षोभक बोलायला लावले म्हणून सात जणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. या एफआयआरमधील अखेरचे संशयित दुधाप्पा बागेवाडी यांनी यात्रेसाठी परवानगी घेतलेली असताना तेथे राजकारण सुरू झाले, शिवाय ध्वनीक्षेपकासाठी स्वतंत्र परवानगी न घेतल्याचा ठपका ठेवत गुन्हा दाखल केला.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today's Marathi News Live : रवींद्र वायकर आज उमेदवारी अर्ज भरणार

Maharashtra Weather Update: महाराष्ट्र तापला! कोकणासह मराठवाड्यात उष्णतेची लाट, 'या' ठिकाणी पावसाची शक्यता

Health Insurance: आरोग्य विम्याचा लाभ मिळेना; ४३ टक्के लोकांचे दावे रखडले, अहवालातुन धक्कादायक खुलासा

Crying Benefits : काय सांगता! रडणे देखील आरोग्यासाठी फायदेशीर आहे; वाचा अश्रूंचं महत्व

Summer Tips: कडक उन्हातून घरी आल्यावर या '५' गोष्टींची घ्या काळजी; नाहीतर

SCROLL FOR NEXT