बातम्या

#SakalSaamExitPolls : कोकणात भाजप 1 शिवसेना 4 राष्ट्रवादी 1 जागा

सकाळ न्यूज नेटवर्क

एक्झिट पोल 2019 : यंदाच्या लोकसभा निवडणुकीमध्ये कोकणचा बालेकिल्ला पुन्हा एकदा युतीलाच साथ देणार असल्याचे स्पष्ट चित्र 'सकाळ' आणि 'साम टीव्ही'च्या विश्वासार्ह सर्वेक्षणातून समोर आले आहे. देशातील सातव्या आणि शेवटच्या टप्प्यातील मतदान संपल्यानंतर एक्झिट पोलचे अंदाज जाहीर केले जात आहेत.

'सकाळ' आणि 'साम'ने राज्यभरात घेतलेल्या सर्वेक्षणामधून समोर आलेले राजकीय चित्रही स्पष्ट झाले आहे. यावेळी कोकणामध्ये विरोधी पक्षांनी जोर लावला होता; पण कोकणातील एकूण सहा जागांपैकी तब्बल पाच जागांवर भाजप-शिवसेना युतीचे उमेदवार विजयी होतील, असे सध्याचे चित्र आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसला एका जागेवर यश मिळू शकेल.

२०१४ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये भाजप-शिवसेना या दोन पक्षांना मिळून ४१ जागा मिळाल्या होत्या. यावेळी 'मोदी लाट' आहे की नाही, याची जोरदार चर्चा देशभरात सुरू असली, तरीही कोकणामध्ये मात्र शिवसेना-भाजपचीच लाट राहील, हे निश्चित झाले आहे.

Web Title: Sakal Saam Exit Poll results BJP Shiv Sena to win Kokan

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today's Marathi News Live : नागपूर एअरपोर्ट बॉम्बने उडवू; धमकीच्या मेलने खळबळ

Viral Video: मस्ती केली, चांगलीच जिरली! भररस्त्यात तरुण खुर्ची टाकून बसला; पुढं जे घडलं ते... धक्कादायक VIDEO

शिर्डीतील साईनाथ रुग्णालयात डायलिसिस सुविधा मिळणार मोफत, साई भक्ताकडून 24 लाखाच्या मशीनची देणगी

Mumbai Local News Today: लोकलचा डबा रुळावरुन घसरला! कुठे? कधी? कसा? हार्बर लाईनने प्रवास करणाऱ्यांसाठी मोठी बातमी

PM मोदींच्या सभेने काही फरक पडणार नाही, कोल्हापुरकरांचा निर्णय पक्का; मालोजीराजे छत्रपतींना विश्वास, Video

SCROLL FOR NEXT