बातम्या

2000 च्या नोटेसंदर्भात RBI चा मोठा खुलासा

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही

सध्या एका व्हाय़रल मेसेजने सर्वसामान्यांची झोप उडवलीय. 2000 च्या नोटेसंदर्भात हा मेसेज आहे. या मेसेजमध्ये 2000ची नोट लवकरच बंद होणार असल्याचा दावा केला गेलाय. त्यामुळे हा मेसेज अक्षरश:आगीप्रमाणे पसरतोय. या मेसेजमध्ये म्हटलंय की RBI ने आपल्या अधिकाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द केल्या असून एक मोठा निर्णय होण्याची शक्यता आहे. 2000ची नोट बंद करण्यात येणार आहे. सरकारकडून लवकरच या संदर्भातली घोषणा केली जाईल असेही सांगण्यात आलंय. आधीच आर्थिक मंदी त्यातच 2000 ची नोट बंद होणार असल्याचा मेसेज. स्वाभाविक प्रत्येकाची चिंता वाढलीय...

यासंदर्भात आरबीआय़नं खुलासा केलाय, दोन हजारांची नोट बंद होणार नाही, लोकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये असे स्पष्टीकरण RBI नं ट्विटकरुन दिलंय.

2 हजाराची नोट बंद होणार नाही लोकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये .याआधीही 2000च्या नोटेत चिप असल्याची अफवा पसरवण्यात आली होती.

आरबीआयच्या स्पष्टीकरणानंतरही खोटा मेसेज जोरात व्हायरल होतोय. पण या मेसेज वर विश्वास ठेवू नका. तुमच्या खिशातील 2000ची नोट यापुढंही चलनात राहणार आहे.

WebTitle : marathi news RBI tweets on banning 2000 note 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ankita Lokhande: हृदयस्पर्शी कॅप्शनसह अंकिता लोखंडेने पतीसोबतचा रुग्णालयातील फोटो केला शेअर

Maharashatra Elction: कोकणात ठाकरे विरुद्ध ठाकरे लढाई; उद्धव आणि राज ठाकरेंच्या सभांचा झंजावात

Petrol वर नाही CNG वर धावणार Bajaj ची नविन बाईक, Platina पेक्षा देणार जास्त मायलेज

Poco X6 5G नविन अवतारात लॉन्च झाला, मिळणार जबरदस्त फीचर्स

Farmers Protest: पंजाबमध्ये शेतकऱ्यांचे रेल रोको आंदोलन, 3 दिवस 46 गाड्या रद्द; 100 मार्ग बदलले

SCROLL FOR NEXT