बातम्या

संपूर्ण पुण्याचा पाणीपुरवठा गुरुवारी बंद राहणार..

सकाळ न्यूज नेटवर्क

पुणे - महापालिकेच्या पर्वती जलकेंद्र अखत्यारीतील पर्वती, वडगाव, लष्कर, एसएनडीटी, वारजे आणि होळकर पंपिंग येथे विद्युतविषयक देखभाल व दुरुस्तीची कामे केली जाणार आहेत. त्यामुळे संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा गुरुवारी (दि. ७ ) बंद राहणार आहे. शुक्रवारी सकाळी उशिरा व कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे. 

पाणीपुरवठा बंद असणाऱ्या भागांमध्ये पर्वती जलकेंद्राच्या अखत्यारीतील शहरातील सर्व पेठा, दत्तवाडी परिसर, राजेंद्रनगर, लोकमान्यनगर, डेक्कन परिसर, शिवाजीनगर, स्वारगेट, पर्वती दर्शन, मुकुंदनगर, पर्वतीगाव, सहकारनगर, सातारा रोड, पद्मावती, बिबवेवाडी, तळजाई, कात्रज, धनकवडी, इंदिरानगर, कर्वे रोड ते एसएनडीटी, एरंडवणा, संपूर्ण कोथरूड, डहाणूकर कॉलनी, कर्वेनगर, लॉ कॉलेज रोड, सेमिनरी झोन, मिठानगर, शिवनेरीनगर, भाग्योदयनगर, ज्ञानेश्‍वरनगर, साईबाबानगर, कोंढवा खुर्द, पर्वती टॅंकर भरणा केंद्र, पद्मावती टॅंकर भरणा केंद्र, तर वडगाव जलकेंद्र परिसरातील हिंगणे, आनंदनगर, वडगाव, धायरी, आंबेगाव पठार, दत्तनगर, धनकवडी, कात्रज, भारती विद्यापीठ, कोंढवा बुद्रूक या परिसराचा पाणीपुरवठा बंद असणार आहे. 

चतु:शृंगी, एसएनडीटी, वारजे जलकेंद्र परिसरातील पाषाण, औंध, बोपोडी, खडकी, चतु:शृंगी, गोखलेनगर, जनवाडी, रेंजहिल्स, बावधन, बाणेर, चांदणी चौक, किष्किंधानगर, रामबाग कॉलनी, डावी उजवी भुसारी कॉलनी, धनंजय सोसायटी, एकलव्य कॉलनी, महात्मा सोसायटी, गुरू गणेशनगर, पुणे विद्यापीठ, वारजे हायवे, वारजे माळवाडी, रामनगर, अहिरेगाव, पॉप्युलरनगर, अतुलनगर, शाहू कॉलनी, वारजे जलशुद्धीकरण परिसर, औंध बावधन, सूस, सुतारवाडी, भूगाव रोड. नवीन होळकर पंपिंग परिसरातील विद्यानगर, टिंगरेनगर, कळस, धानोरी, लोहगाव, विश्रांतवाडी, विमाननगर, नगर रोड आणि लष्कर जलकेंद्र परिसराच्या अखत्यारीतील लष्कर भाग, पुणे स्टेशन, मुळा रस्ता, कोरेगाव पार्क, ताडीवाला रोड, रेसकोर्स, वानवडी, कोंढवा, हडपसर, महंमदवाडी, काळेपडळ, मुंढवा, येरवडा, विश्रांतवाडी, नगररस्ता, कल्याणीनगर, महाराष्ट्र हौसिंग बोर्ड कॉलनी, वडगाव शेरी, चंदननगर, खराडी, सोलापूर रस्ता, गोंधळेनगर, सातववाडी या परिसराचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे.

Web Title: Water supply in Pune city will be closed on Thursday

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Delhi School Bomb Threat: शाळांमध्ये बॉम्ब ठेवल्याची धमकी प्रकरण, दिल्ली सरकारने शिक्षकांना दिल्या 'या' महत्वाच्या सूचना

Samruddhi Highway Accident: समृद्धी महामार्गावर भरधाव ट्रकची कंटेनरला धडक; १ ठार २ जखमी, वाशिममधील घटना

Abhijit Patil Supports BJP: महाविकास आघाडीला मोठा धक्का! सोलापुरात बड्या नेत्याचा भाजपला पाठिंबा

Todays Horoscope: 'या' राशीच्या लोकांचं नशीब उजळलं; लवकरच गोड बातमी मिळणार, वाचा आजचे पंचांग

Maharashtra Politics: मी दिलेलं चॅलेंज स्वीकारलं नाही; श्रीकांत शिंदेंनी आदित्य ठाकरेंना डिवचलं

SCROLL FOR NEXT