बातम्या

पुण्यात हवामान खात्याकडून "रेड ऍलर्ट'

सकाळ न्यूज नेटवर्क

पुणे - शहर आणि परिसरात बुधवारी (ता. 7) संध्याकाळपासून पावसाचा जोर वाढणार असल्याने हवामान खात्याने "रेड ऍलर्ट' दिला असून, पुढील दोन ते तीन दिवस मुसळधार पावसाची शक्‍यता वर्तविण्यात आली.

पुणे शहर आणि त्याच्या जवळील घाटमाथ्यांवर गेल्या आठवड्यापासून जोरदार पाऊस पडला. आज पावसाने काहीशी विश्रांती घेतली. मात्र, आता उद्यापासून पुन्हा मुसळधार पावसाला सुरवात होईल, असा इशारा हवामान तज्ज्ञ डॉ. अनुपम कश्‍यपी यांनी "सकाळ'शी बोलताना दिला. 

ते म्हणाले, ""पुण्यात उद्या दिवसभर पावसाच्या हलक्‍या ते मध्यम सरी पडतील. मात्र, रात्रीपासून पावसाचा जोर वाढणार असून, मुसळधार पावसाच्या सरी गुरुवारपर्यंत (ता. 8) सुरू राहतील. शहराच्या जवळ असलेल्या माळशेज, ताम्हिणी घाटमाथ्यावरही मुसळधार पावसाची शक्‍यता आहे. त्याबाबत सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.'' 

का वाढणार पाऊस? 
बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. त्याची तीव्रता सातत्याने वाढत आहे. पुढील चोवीस तासांमध्ये त्याचे रूपांतर अतितीव्र कमी दाबाच्या क्षेत्रात होण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे. त्याचा थेट परिणाम कोकण, मध्य महाराष्ट्रावर होईल. त्यामुळे पुण्यात पुढील दोन दिवसांमध्ये मुसळधार पाऊस पडेल, असे हवामान खात्यातर्फे सांगण्यात आले. 

मराठवाड्यात पावसाची शक्‍यता 
मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसामुळे सतर्कतेचा इशारा दिला आहे. त्याचवेळी दुष्काळात होरपळणाऱ्या मराठवड्यात पावसाच्या हलक्‍या ते मध्मम सरी हजेरी लावतील, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. विदर्भातही मध्यम ते जोरदार सरी पडतील. 

ही काळजी घ्या 
- आवश्‍यकता असेल तरच घराबाहेर पडा 
- वाहतुकीची माहिती घेऊन प्रवासाचे नियोजन करा 
- पर्यटन स्थळांवर जाणे टाळा 
- महामार्गांवरचा प्रवास टाळा 
- धबधबे, जलाशयात जाण्याचे धाडस टाळा

Web Title: Red alert in Pune

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mental Health: मानसिक आरोग्य बिघडलंय? अशी घ्या काळजी

Dharashiv Lok Sabha Votting Live: लातूरच्या औसा येथे EVM मध्ये तांत्रिक बिघाड, ४५ मिनिटांपासून मतदान थांबले

Solapur Breaking: मतदानाला सुरुवात होताच सोलापूरमध्ये EVM मशीनमध्ये बिघाड; मतदारांचा खोळंबा, अधिकाऱ्यांची धावपळ

Maharashtra Weather Forecast: राज्यात पुढील २ दिवस तापमानात वाढ होणार, मराठवाडा आणि विदर्भात गारपीटीची शक्यता

Baramati Lok Sabha: बारामतीत पैशांचा पाऊस, पोलीस बंदोबस्तात मतदारांना पैसे वाटले; VIDEO शेअर करत रोहित पवारांचा गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT