बातम्या

केबल ग्राहकांनो अनावश्यक चॅनेल टाळून ठेवा खर्चावर नियंत्रण

सकाळ न्यूज नेटवर्क

पुणे - नव्या नियमानुसार केबल ग्राहकांना स्वत: दूरचित्रवाहिन्या (चॅनेल) निवडण्याची मुभा मिळालेली आहे. त्यामुळे अनावश्‍यक चॅनेलचा भरणा टाळून खर्चावरही नियंत्रण ठेवता येणार आहे. ग्राहक त्यांना हवे असलेल्या चॅनेलची मागणी केबल चालकांकडे करू शकेल. त्यानुसार चॅनेल उपलब्ध करून देणे त्यांच्यावर बंधनकारक आहे.

टेलिकॉम रेग्युलेटरी ऑफ इंडियाने (ट्राय) चॅनेल निवडण्याचे स्वातंत्र्य ग्राहकांना दिले आहे. एक फेब्रुवारीपासून हा नियम लागू होईल. त्यानंतर ‘फ्री टू एअर’ दूरचित्रवाहिन्या १३० रुपये देऊन पाहता येतील. याबाबत काही केबल ऑपरेटरकडे विचारणा केली असता त्यांनी सांगितले, की ग्राहक त्यांना आवडेल ते चॅनेल निवडू शकतात. मोफत चॅनेल वगळता अन्य ‘पेड’ चॅनेलचे शुल्क त्यांना भरावे लागेल. त्यासाठी ग्राहकांनी त्यांच्या केबलचालकाशी संपर्क साधायचा आहे.

अनेक केबलचालकांनी पूर्वी प्रमाणेच वाहिन्यांचे पॅकेज तयार केले आहेत. ती थोपविण्याचा प्रयत्नही होत आहे. परंतु, नव्या नियमावलीनुसार ग्राहक त्याला आवडेल, त्या चॅनेलची निवड करू शकतो. प्रत्येक चॅनेलचे शुल्क ग्राहकांना सांगणे, त्याबद्दलची माहिती उपलब्ध करून देणे आवश्‍यक आहे. त्यांचे पॅकेज नको असेल, तर ग्राहकांना आवडीच्या चॅनेलचे पॅकेज तयार करून त्याप्रमाणे मागणी करता येईल. वाहिन्यांच्या शुल्काची माहिती ट्रायच्या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे.

तक्रारीसाठी यंत्रणाच नाही
केबलचालक हे त्यांनी तयार केलेल्या वाहिन्यांचे पॅकेज ग्राहकांवर लादण्याचा प्रयत्न करीत असेल, तर त्याची तक्रार करण्यासाठी स्थानिक प्रशासनाची कोणतीही यंत्रणा नाही. केबल चालकांवर पूर्वी जिल्हा प्रशासनाच्या करमणूक कर शाखेचे नियंत्रण होते. परंतु, सरकारने हा विभाग बंद केला आणि ते काम स्थानिक स्वराज संस्थांकडे दिले. 

Web Title: Cable customers can have control over the cost by avoiding unnecessary channels

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

LSG vs KKR : कोलकाताकडून लखनऊचा दारूण पराभव, पॉइंट्स टेबलमध्ये मोठा उलटफेर

Canada Import from India : कॅनडा भारताकडून काय मागवतो

Uddhav Thackeray: मोदींचं PM पदासाठी नाव सुचवलं हे माझं पाप, उद्धव ठाकरे यांनी भरसभेत व्यक्त केली खंत

Mumbai Local : तीन प्रवाशांच्या मृत्यूनंतर मध्य रेल्वेला आली जाग; लोकलच्या गर्दी नियंत्रणासाठी घेतला मोठा निर्णय

Today's Marathi News Live : १७ लाख कुटुंबांनी भारतीय नागरिकत्व सोडलं; प्रकाश आंबेडकरांचा भाजपवर हल्लाबोल

SCROLL FOR NEXT