बातम्या

अख्खं कुटुंबच गेलं, मदतीचे पैसे द्याचे तरी कोणाला ?

सकाळ न्यूज नेटवर्क

पुणे : कोंढव्यात झालेल्या दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेले बहुतांशजण हे एकाच कुटुंबातील आहेत. एकाचवेळी कुटुंबातील सर्वचजण दगावल्यामुळे महापौर, जिल्हाधिकाऱ्यांनी जाहीर केेलेल्या मदतीची रक्कम नक्की द्यायची कोणाकडे असा प्रश्न उभा राहिला आहे. 

या दुर्घटनेत मृत्यू झालेले बहुतांशजण हे एकाच कुटुंबातील आहेत, तसेच एकमेकांचे नातेवाईकही आहेत. या घटनेत संपूर्ण कुटुंबसह, नातेवाईक आणि त्यांची मुलेही मृत्यूमुखी पडली आहेत. घटनास्थळी महापौर मुक्ता टिळक, राज्यमंत्री विजय शिवतारे, जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी भेट दिली. त्यांनी मृतांच्या नातेवाईकांना काही लाख रुपये देण्याची घोषणाही केली. पण आर्थिक मदतीचे धनादेश नेमके द्यायचे कोणाला असा प्रश्न त्यांच्या समोर उपस्थित झाला आहे.

या दुर्घटनेनंतर राज्यमंत्री तानाजी सावंत यांच्याकडून मृतांच्या नातेवाईकांना एक लाखांची मदत जाहीर करण्यात आली आहे तर नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापनाकडून चार लाखाची मगत जाहीर करण्यात आली आहे. 

Web Title: 15 dead in the Kondhwa Accident in Pune

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Solapur Loksabha: मोहोळचे माजी आमदार रमेश कदम यांचा महायुतीला पाठिंबा; राम सातपुतेंची ताकद वाढणार?

Mohan Bhagwat News : आरक्षणावरून राहुल गांधी आणि मोहन भागवत यांच्यात जुंपली

Crime News: प्रेमाचा भयानक शेवट! लग्नासाठी प्रेयसीचा दबाव, संतापलेल्या टॅक्सी ड्रायव्हरकडून भयानक कृत्य

Upcoming Smartphone in May 2024 : दमदार फीचर्स अन् जबरदस्त कॅमेरासह मे महिन्यात लॉन्च होणार Vivo, Apple सारखे स्मार्टफोन, लिस्ट पाहा

kashmir Accident News: काश्मीरमध्ये टॅक्सी नदीत कोसळून ४ पर्यटकांचा मृत्यू; तर दोघे बेपत्ता

SCROLL FOR NEXT