बातम्या

किराणा दुकानावरच्या पॅकिंगवरची बंदी उठवली ; स्वत:ची पाठ थोपटणाऱ्या राज्य सरकारचा फुसका बार 

सकाळ न्यूज नेटवर्क

प्लास्टिकबंदीचा गाजावाजा करून स्वत:ची पाठ थोपटणाऱ्या राज्य सरकारचा बार फुसका ठरलाय. कारण प्लास्टिकबंदी शिथिल करण्याची घोषणा पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी केलीय.

आजपासून किराणा दुकानावरच्या पॅकिंगवरची बंदी उठवण्यात येणारंय़. छोट्या दुकानदारांना पॅकिंगवर घालण्यात आलेली बंदी सरसकट उठवण्यात आलीय. पाव किलोपासून पुढच्या पॅकिंगला प्लास्टिक वापरण्याची मुभा देण्यात आल्याची माहिती रामदास कदम यांनी दिलीय.

विशेष म्हणजे प्लास्टिक पर्यावरणासाठी हानीकारक आहे. हा एक क्रांतीकारक निर्णय आहे असा गाजावाजा याच रामदास कदम यांनी केला होता.

मात्र, अवघ्या चार दिवसात रामदास कदम आणि राज्य सरकारचा हा प्लास्टिकबंदीचा बार फुसका ठरलाय. 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Relationship Tips : वेळीच नाही बोलणे शिकून घ्या; आयुष्यभर आनंदी रहाल

Today's Marathi News Live : यवतमाळला चार दिवसांचा येलो अलर्ट

Petrol Diesel Rate (6th May 2024): निवडणूक काळात पेट्रोल-डिझेलच्या किमतीत घट? जाणून घ्या राज्यातील आजचा भाव

Sambhajinagar Accident : लग्न सोहळ्याहून परत येताना आई-मुलावर काळाचा घाला; टेम्पोची दुचाकीला धडक

Breaking News: अमेठीत काँग्रेस कार्यालयाबाहेर उभ्या असलेल्या १० ते १२ वाहनांची तोडफोड; भाजपवर गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT