बातम्या

पेट्रोल 9 तर डिझेल 17 पैशांनी महागले

सकाळ न्यूज नेटवर्क

आज पुन्हा इंधन दरवाढ करण्यात आली. मुंबईत पेट्रोल प्रतिलिटर 9 पैसे तर डिझेल 17 पैशांनी महागले आहे.

त्यामुळे आज मुंबईत पेट्रोलचा दर 90.84 रुपयांवर पोहोचला आहे. तर डिझेलसाठी मुंबईकरांना आज 79.40 रुपये मोजावे लागतील.

राज्यासह देशभरात दररोज इंधनाचे दर वाढत आहेत. त्यामुळे सर्वसामान्य जनता मेटाकुटीला आली आहे. डिझेलच्या किमतीत वाढ झाल्यानं माल वाहतुकीचा खर्च वाढला आहे. 

त्यामुळे भाजीपाल्यांसह सर्वच वस्तूंचे दर वाढण्याची शक्यता आहे. चालू आर्थिक वर्षात इंधनाचे दर चांगलेच भडकले आहेत. आतापर्यंत फक्त 29 मे ते 5 जुलैदरम्यान दरात घसरण झाली होती. त्यानंतर 6 जुलै ते 29 सप्टेंबरदरम्यान बहुतांश दिवस इंधनाचे दर वाढले. कच्च्या तेलाचे दर वाढत असल्याने देशांतर्गत इंधन महाग होत आहे.  
 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Josh Baker Death: इंग्लंडच्या २० वर्षीय जोश बेकरच्या मृत्यूचं नेमकं कारण काय?

Gondia News : १५० रुपये क्विंटलने मोबदला मिळेपर्यंत भरडाई बंद ठेवण्यावर राईस मिलर्स ठाम; ५४० कोटीचे धान पडून

Maval News: अंघोळीसाठी पाण्यात उतरले, पोहताना दम लागला; इंद्रायणी नदीत बुडून दोन भावंडांचा मृत्यू

WhatsApp Account Ban: व्हॉट्सअॅपकडून भारतात गेल्या वर्षी ७ कोटी अकाउंट्सवर बंदी; अहवालातून माहिती समोर

Chitra Wagh : "मी चारित्र्यवान कलावंत, माफी मागा नाहीतर...", 'त्या' अभिनेत्याचा चित्रा वाघ यांना थेट इशारा

SCROLL FOR NEXT