बातम्या

बिहारमध्ये 'लू' मुळे 24 तासांत 80 जण मृत्युमुखी 

सकाळ न्यूज नेटवर्क

पाटणा : बिहारमधील उष्म्यामुळे मरण पावलेल्यांची संख्या आज दोनशेच्यावर पोचली. गरम वाऱ्यांच्या 'लू'मुळे गेल्या 24 तासांत 80 जण मरण पावले. गया शहरात प्रशासनाने जमावबंदीचा आदेश (कलम 144) लागू केला आहे. 
बिहारवर सध्या चमकी तापाचे संकट असताना त्यात उष्म्याची भर पडली आहे. मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी ताप आणि लूमुळे उद्‌भवलेल्या स्थितीचा आढावा घेऊन आरोग्यसेवेला वेगाने काम करण्याचा आदेश दिला.

राज्याच्या औरंगाबाद, गया, नवादा, खगडिया, भागलपूर आणि पाटणामध्ये लूमुळे मरण पावलेल्यांची संख्या सातत्याने वाढत आहे. 80 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती सरकारतर्फे देण्यात आली असली तरी, एव्हाना हा आकडा दोनशेच्या वर गेला आहे. लूमुळे मरण पावलेल्यांचे शवविच्छेदन करण्याची सूचना आरोग्य विभागाला देण्यात आली आहे. प्रत्येक मृताच्या कुटुंबीयांना सरकारतर्फे चार लाख रुपयांची मदत दिली जाणार असल्यामुळे ही सूचना देण्यात आली आहे.

चमकी तापाच्या साथीबाबत निष्काळजीपणा केल्याचा आरोप करून केंद्रीय आरोग्यमंत्री हर्ष वर्धन आणि बिहारचे आरोग्यमंत्री मंगल पाण्डेय यांच्याविरुद्ध मुझफ्फरपूरमध्ये याचिका दाखल करण्यात आली आहे. सामाजिक कार्यकर्त्या तमन्ना हाशमी यांनी मुख्य न्यायदंडाधिकाऱ्यांच्या न्यायालयात ही याचिका दाखल केली आहे. न्यायालयाने ती दाखल करून घेतली असून, येत्या 24 जूनला त्यावर सुनावणी होईल. सरकारच्या बेपर्वाईमुळे तापाच्या साथीत 82 मुले मरण पावल्याची तक्रार याचिकेत करण्यात आली आहे.

Web Title: In Bihar heatwave kills across two hundred; In last twenty four hours 80 people died

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Drinking Milk: रात्री झोपण्यापूर्वी दूध का पिऊ नये?

Covid Vaccine Certificate: कोविड लसीकरण प्रमाणपत्रावरील PM मोदींचा फोटो गेला कुठं?, समोर आलं कारण

Today's Marathi News Live : पृथ्वीराज पाटील यांचा विधानसभेत कसा पराभव झाला ते संपूर्ण सांगली जिल्ह्याला माहिती, चंद्रहार पाटील यांचा रोख कोणाकडे?

Sleeping Promblem: रात्री चांगली झोप लागत नाही, आहारात करा बदल

Lok Sabha Election: नवी मुंबईत भाजपमध्ये फूट?, मंदा म्हात्रे यांचं मोठं वक्तव्य

SCROLL FOR NEXT