बातम्या

पंकजा मुंडे भाजप सोडण्याच्या मार्गावर? लवकरच करणार घोषणा

साम टीव्ही न्यूज


मुंबई : देवेंद्र फडणवीस सरकार साडेतीन दिवसांतच कोसळलं. त्यानंतर राजकीय पुनर्वसनाचे मार्गच खुंटल्यामुळे भाजपचे काही नेते आता वेगळ्या मार्गाने जाण्याचा विचार करत असल्याचं कळंतय.  त्यात आता माजी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांचाही समावेश आहे. पंकजा मुंडे भाजप सोडण्याचा विचार करत असल्याचं कळतंय.  12 डिसेंबर रोजी गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीदिनी त्या गोपीनाथ गडावर मोठा निर्णय जाहीर करण्याची शक्यताय. विधानसभा निवडणुकीत धनंजय मुंडे यांच्याकडून दारून पराभव झाला होता. तेव्हापासूनच पंकजा मुंडे प्रचंड नाराज आहेत. भाजपचे सरकार आले तर किमान विधान परिषदेवर जाऊन राजकीय पुनर्वसन होण्याची आशा त्यांना होती. परंतु देवेंद्र फडणवीसांचे सरकार साडेतीन दिवसांतच कोसळले आणि शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या महाराष्ट्र विकास आघाडीचे सरकार सत्तारूढ झाले. त्यामुळे भाजपत राजकीय पुनर्वसन होण्याच्या पंकजा मुंडेंच्या आशा मावळल्या आहेत. त्यामुळेच त्या वेगळा विचार करत असल्याचे सूत्रांनी सांगितले. आज त्यांनी केलेल्या फेसबुक पोस्टमध्ये तसे स्पष्ट संकेतच पंकजांनी दिले आहेत.
----------
नेमकं फेसबूक पोस्टमध्ये पंकजा मुंडे यांनी काय म्हटलंय.. आपण पाहूया..


----------------------
‘आज राजकारणात झालेले बदल, जबाबदारीत झालेले बदल या सगळ्या संदर्भाचा विचार करून आपला पुढचा प्रवास ठरवण्याची आवश्यकता आहे. पुढे काय करायचे? कोणत्या मार्गाने जायचे?’ या सगळ्या गोष्टींचा विचार करून 12 डिसेंबर रोजी त्या भूमिका स्पष्ट करणार असल्याची घोषणा त्यांनी फेसबुक पोस्टद्वारे केली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today's Marathi News Live: भाजपचे पुण्यातील उमेदवार यांच्या प्रचारासाठी राज ठाकरे घेणार सभा

Raireshwar Fort: १६० मतदारांसाठी अधिकारी, कर्मचा-यांचा ४ हजार ५०५ फुटापर्यंत ट्रेक, रायरेश्वर केंद्र मतदानासाठी सज्ज

Black Pepper Benefits: काळी मिरी खाण्याचे आरोग्यवर्धक फायदे, घ्या जाणून

Marathi Manus : महाराष्ट्रात मराठी माणसाला अशी वागणूक, म्हणे 'नॉट वेलकम'! मराठी तरूणाच्या मनाला काय वाटलं? वाचा

Yashwant Killedar MNS | मनसे आणि ठाकरे गट शिवाजी पार्क कुणाला?

SCROLL FOR NEXT