बातम्या

कराचीजवळच्या सोनीमनीमध्ये पाकने केली गझनवी क्षेपणास्त्राची चाचणी

सकाळ न्यूज नेटवर्क

इस्लामाबाद : अर्थव्यवस्था खड्ड्यात गेलेल्या पाकिस्तानला भारतासोबत युद्धाची खुमखुमी आली आहे. त्यामुळे काल रात्री पाकिस्तानात क्षेपणास्त्र चाचणी करण्यात आली आहे. जम्मू-काश्मीरमधील कलम 370 रद्द करण्याच्या निर्णय भारताने घेतल्यानंतर पाकिस्तानाच तीळपापड झाला आहे.

कराचीजवळच्या सोनीमनी या ठिकाणी चाचणीच्या क्षेत्रात लष्करी सराव होणार असल्याची सूचना यापूर्वीच देण्यात आली होती. आज (ता. 29) पहाटे 4:40 ते 9च्या दरम्यान ही चाचणी करण्यात आली. काल (ता. 28) या चाचणीमुळेच कराचीला जाणारे तीन हवाई मार्ग बंद ठेवण्याचे निर्णय घेण्यात आला होता. 

पाकिस्तानने भारताशी सगळे आर्थिक संबंध तोडले आहेत. पाकिस्तान आंतरराष्ट्रीय पातळीवर भारता विरोधात मोर्चेबांधणी करण्याचा प्रयत्न करत आहे. त्यात त्याला अपयश आलंय. त्यांच्या संसदेत या मुद्द्यांवर विरोधक आणि सत्ताधारी यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. कोणत्याही पातळीवर भारताविरोधात यश येत नसल्याने पाकिस्तानने आता त्यांच्या गझनवी क्षेपणास्त्राची चाचणी करून, भारताला इशारा देण्याचा प्रयत्न केला आहे. या क्षेत्रपणास्त्राची चाचणी केल्याबद्दल पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांनी त्यांच्या वैज्ञानिकांचे अभिनंदन केले असून, त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. 

पाकिस्तानची ही क्षेपणास्त्र चाचणी म्हणजे भारताला धमकी देण्याचा प्रकार असल्याचे मानले जात आहे. पाकिस्तानात बुधवारी रात्री ही चाचणी करण्यात आली आहे. पाकिस्तानच्या डीजी आईएसपीआर या संस्थेने ट्विटरवरून याची माहिती दिली आहे. जमिनीवर 290 किलोमीटर मारक क्षमता असलेले हे क्षेपमास्त्र असून, पाकिस्तानच्या राष्ट्रपती आणि पंतप्रधानांनी या चाचणीबद्दल संशोधनकांचे अभिनंदन केल्याचेही ट्विटमध्ये म्हटले आहे. काश्मीरमधील कलम ३७० हटविल्यानंतर भारत-पाकिस्तान यांच्यात तणाव वाढला आहे. सीमेवरही पाकिस्तानने कुरघोड्या सुरू केल्या असून, काही दहशतवाद्यांना भारतात घुसविण्याची तयारी चालवल्याचीही माहिती आहे.

WebTitle : marathi news pakistan tested ghazanavi missiles once again 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Naach Ga Ghuma Collection : 'नाच गं घुमा'ची बॉक्स ऑफिसवर जोरदार कमाई; दोन दिवसांतच जमावला कोट्यवधींचा गल्ला

Petrol Diesel Rate 3rd May 2024: पेट्रोल-डिझेलचे नवे दर जाहीर; वाचा तुमच्या शहरात स्वस्त झालं की महागलं

Today's Marathi News Live : सुप्रिया सुळे यांना निवडून आणण्यासाठी आईही मैदनात

Avinash Jadhav: मनसे नेते अविनाश जाधव यांच्यावर खंडणीचा गुन्हा; सराफा व्यापाऱ्याकडे ५ कोटी मागितल्याचा आरोप

Health Tips: सकाळी प्या हिंगाचे पाणी, वजन राहील नियंत्रणात

SCROLL FOR NEXT