बातम्या

भारतीय जनता पक्षाची विचारसरणी ही व्यक्तिकेंद्रित नाही : गडकरी

सकाळ न्यूज नेटवर्क

नवी दिल्ली : भारतीय जनता पक्षाची विचारसरणी ही व्यक्तिकेंद्रित नाही. तर विचारांवर उभा राहिलेला हा पक्ष म्हणून आहे. हा पक्ष केवळ नरेंद्र मोदी-अमित शहांचा नाही, असे केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी आज (शुक्रवार) सांगितले. तसेच हा पक्ष ना कधी अडवणींचा बनू शकला ना कधी अटलजींचा बनला. म्हणून भाजप हा पक्ष केवळ मोदी-शहांचा बनू शकत नाही, कारण हा पक्ष व्यक्तिकेंद्रित नाही, असेही ते म्हणाले.

एनडीटीव्हीला दिलेल्या मुलाखतीत गडकरी यांनी याबाबत वक्तव्य केले. ते म्हणाले, यंदाच्या लोकसभा निवडणुकीत भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा (एनडीए) सर्वाधिक मताधिक्याने विजय होऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाखालील सरकार स्थापन होईल. आम्ही आता भाजपचे नाहीतर एनडीएचे सरकार स्थापन करू. तसेच जर आम्ही स्वबळावर सत्ता स्थापन करू शकलो तरीदेखील आम्ही एनडीएचे सरकार स्थापन केल्याचे मानून त्यानुसार एनडीएतील घटक पक्षांना सोबत घेऊन सरकार स्थापन करणार आहोत. 

पंतप्रधानपदाच्या शर्यतीत नाही

पंतप्रधानपदाच्या शर्यतीत मी नाही. तशी माझी इच्छा किंवा त्याबाबत माझा कोणाताही अजेंडाही नाही, असे स्पष्टीकरण देत त्यांनी पंतप्रधानपदाच्या चर्चांना पूर्णविराम दिला. तसेच नरेंद्र मोदी हे आमचे आहेत. ते पंतप्रधान होतील, असेही ते म्हणाले.

Web Title: marathi news nitin gadkari on bjp modi and amit shah

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today's Marathi News Live : रवींद्र वायकर यांच्या बालेकिल्ल्यात ठाकरे गटाचा मेळावा

Sharad Pawar आणि Thackeray यांना पाहण्यासाठी इचलकरंजीकर धडपडले, नेमकं काय घडलं?

Sudhir Mungantiwar: शिवरायांची वाघनखं आणण्यास विलंब का होतोय?, सुधीर मुनगंटीवारांनी सांगितलं कारण

Uddhav Thackaeray: भाजपने केलेल्या पाडापाडीचा सूड घेणार; इचलकरंजीत उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली

Lok Sabha Election 2024 : टीएमसीपेक्षा भाजपलाच मतदान करा; काँग्रेसच्या बड्या नेत्याचं वक्तव्य

SCROLL FOR NEXT