बातम्या

लोकसभा निवडणूक उधळून लावण्याचा पाकचा होता कट!

सकाळ न्यूज नेटवर्क

नवी दिल्ली : जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतामध्ये सार्वत्रिक निवडणूक हा एक अत्यंत महत्त्वाचा आणि संपूर्ण जगाचे लक्ष वेधून घेणारा घटक असतो. याच निवडणुकीला लक्ष्य करत भारताला जोरदार धक्का देण्याची योजना पाकिस्तानने आखली होती, अशी गोपनीय माहिती आता बाहेर आली आहे. 2009 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी पाकिस्तानने भारतामध्ये अनेक ठिकाणी दहशतवादी हल्ले घडवून आणण्याचा कट रचला होता. 

अमेरिकी सरकारच्या अधिकृत केबल्सपैकी काहींची गोपनीय माहिती 2011 मध्ये बाहेर आली होती. त्यामध्ये या घटनेचा उल्लेख होता. यासंदर्भात 'इकॉनॉमिक टाईम्स'ने वृत्त प्रसिद्ध केले आहे. 

पुलवामामध्ये गेल्या आठवड्यात झालेल्या दहशतवादी हल्ल्यापूर्वीच्या घडामोडींशी 2009 मधील घटनांशी साधर्म्य असल्याचेही सांगितले जात आहे. यंदाही निवडणुकीच्या तोंडावरच हा हल्ला झाल्याने भारतात या सार्वत्रिक निवडणुकीच्या कालावधीत अस्थिरता निर्माण करण्याचा कट पाकिस्तान रचत असल्याची भीतीही काही संरक्षण तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. 

2009 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी पाकिस्तानमधून काश्‍मीरमध्ये घुसखोरीचे प्रमाण प्रचंड वाढले होते. तत्कालीन राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार एम. के. नारायण आणि तत्कालीन परराष्ट्र सचिव शिवशंकर मेनन यांनी अमेरिकी प्रशासनाला यासंदर्भात माहिती दिली होती. त्या वर्षीच्या निवडणुकीपूर्वी एक आठवडा ही बैठक झाली होती. 'निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर अचानक वाढलेल्या या घुसखोरीमध्ये पाकिस्तानचा काहीही हात नाही, असे मान्यच करता येणार नाही', असे भारताने ठामपणे सांगितले होते. 2008 मध्ये वर्षभरात 57 वेळा घुसखोरी झाली होती. पण 2009 च्या पहिल्या चार महिन्यांमध्येच हे प्रमाण 94 वर गेले होते. 

तसेच, 'निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर असा एखादा जरी हल्ला झाला, तरीही भारतावरही ठोस प्रत्युत्तर देण्याचे दडपण येईल आणि मग तसे करावे लागेल', असा इशारा या अधिकाऱ्यांनी अमेरिकेला दिला होता. या बैठकीनंतर अमेरिकेने पाकिस्तानवर दडपण आणले की नाही, हे अधिकृतरित्या समोर आलेले नाही. पण निवडणुकीच्या त्या कालावधीत भारतात दहशतवादी हल्ला झाला नव्हता. 

Web Title: Pakistan tried to disrupt 2009 Indian elections too with major terror event

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: नांदेडच्या देगलूरमध्ये भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात महिला गंभीर जखमी

Gokul Election 2026: सतेज पाटलांनी विरोधकांना दाखवलं आस्मान; वाचा विजयी उमेदवरांची यादी

Skin Care : नाकावर ब्लॅकहेड्स वाढले आहेत? जाणून घ्या घरच्या घरी करता येणारे ७ सोपे उपाय

Tuesday Horoscope : दसऱ्याचा दिवस शुभ ठरणार, मोठे अडथळे दूर अन् काहींना होणार धनलाभ; वाचा मंगळवारचे राशीभविष्य

FDAची मोठी कारवाई; ऐन सणासुदीच्या काळात पुण्यात १० टन पनीर, खवा जप्त

SCROLL FOR NEXT