बातम्या

'तोंडचे पाणी पळवू' Nitin Gadkari यांचा पाकड्यांना इशारा

सकाळ न्यूज नेटवर्क

नवी दिल्ली : पुलवामा हल्ल्यानंतर पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी भारताला युद्धखोरीची धमकी दिलेली असताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी इम्रान खान यांना थेट इशारा दिला आहे. तुमच्या तोंडचे पाणी पळविल्याशिवाय राहणार नाही असे नितीन गडकरी यांनी म्हटले आहे.

भारतातून वाहणाऱ्या तीन नद्यांचे पाणी पाकिस्तानला जाते. हे पाणी यमुना नदीला जोडू आणि पाकिस्तानला ओसाड बनविण्याची धमकीच एकप्रकारे गडकरींनी पाकिस्तानला दिली आहे. या तिन्ही नद्यांना जोडण्याच्या प्रकल्पावर काम सुरु आहे. याद्वारे जलवाहतुकही सुरु केली जाईल असेही गडकरी यांनी सांगितले.

दरम्यान, पुलवामामध्ये सीआरपीएफ जवानांच्या ताफ्यावर जैश-ए-मोहमंदच्या दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात 40 जवान शहीद झाले होते. यानंतर देशामध्ये संतापाची लाट उसळली होती. पाकिस्तानला कायमचाच धडा शिकविण्याची मागणीनेही जोर धरला होता. यावर इम्रान खान यांनी पुलवामा दहशतवादी हल्ल्याचा निषेध व्यक्त न करता भारताने हल्ला केल्यास पाकिस्तान गप्प बसणार नसल्याची दर्पोक्ती केली होती. तसेच त्यांच्या खासदार मंत्र्याने आम्ही हातात बांगड्या भरल्या नसल्याचेही सांगितले होते.

Web Title: India to choke Pakistan's water supply in light of Pulwama says Gadkari

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today's Marathi News Live : आढळराव पाटलांनी निवडणुकीतून बाहेर पडण्याची तयारी ठेवावी: अमोल कोल्हे

Kalyan Constituency: टोमणेवीर जन्माला आलेत; श्रीकांत शिंदेंनी सोडला थेट उद्धव ठाकरेंवर बाण

Wardha Fire : शेतातील गोठ्याला आग; शेती साहित्यासह ६ लाखाचे नुकसान

Bogus Seeds : बोगस एचटीबीटी बियाणे जप्त; नंदूरबार कृषी विभागाची कारवाई

Heart Attack Video: आधी डोकं धरलं, मग जमिनीवर कोसळला.. वर्क आऊट करताना युवा खेळाडूला मृत्यूने गाठलं; थरारक क्षण CCTVत कैद

SCROLL FOR NEXT