बातम्या

दादा भुसे डाॅ सुभाष भामरेंचे तारणहार ठरतील का ?

सकाळ न्यूज नेटवर्क

नाशिक  : धुळे लोकसभा मतदारसंघात मालेगाव मध्य (शहर) आणि बाह्य (दाभाडी) मतदारसंघ कळीचे ठरणार आहेत. शहरावर काँग्रेसचे वर्चस्व आहे. या स्थितीत शहराचे मताधिक्य प्रभावहीन करण्यासाठी बाह्य विधानसभा मतदारसंघांतून शिवसेनेचे राज्यमंत्री दादा भुसे भाजपच्या डाॅ सुभाष भामरे यांना किती मताधिक्य देतात याचीच सगळीकडे चर्चा आहे. मोठे मताधिक्य दिल्यास यंदाच्या निवडणुकीत दादा भुसे डाॅ सुभाष भामरेंचे तारणहार ठरतील हे नक्की.

लोकसभा मतदारसंघातील मालेगाव मध्य विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसला मताधिक्य मिळणार हे स्पष्ट आहे. त्याचवेळी मालेगाव बाह्य विधानसभा मतदारसंघातून भाजप उमेदवाराला किती मताधिक्य मिळणार या विषयी मोठी उत्सुकता आहे. मध्य कॉंग्रेसचा बालेकिल्ला तर मालेगाव बाह्यवर शिवसेनेचे वर्चस्व आहे. लोकसभा निवडणूक प्रचारातून प्रमुख इच्छुकांनी विधानसभेची तयारी केली. यावेळी कॉंग्रेस-शिवसेना हे मतदारसंघ राखणार की तगडे प्रतिस्पर्धी असणार या विषयी उत्सुकता आहे. मालेगाव बाह्यमध्ये ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे व अद्वय हिरे असा सामना रंगण्याची शक्यता आहे.

मालेगाव मध्य मतदारसंघात मोदी लाटेतही कॉंग्रेसला लोकसभेत सव्वा लाखाचे मताधिक्य मिळाले होते. वंचितच्या उमेदवारामुळे हे मताधिक्य कमी होणार की काय याची आकडेमोड सुरु आहे. याउलट बाह्य विधानसभा मतदारसंघात गेल्या निवडणुकीत राज्यमंत्री भुसे व हिरे दोघे केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांच्या पाठीशी होते. हिरे यांनी यावेळी आमदार कुणाल पाटील यांना मदत केली. यामुळे बाह्यमधील डॉ. भामरे यांचे मताधिक्य किती घटणार व विधानसभेला श्री. हिरे भुसेंशी टक्कर घेणार की नाही याचीच चर्चा सुरु आहे. 

विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेऊनच श्री.हिरे यांनी स्वपक्षासह मित्र पक्षातील कार्यकर्त्यांनाही लोकसभा निवडणुकीत खूश केले. त्याचा प्रत्यय मतपेटीत उमटेल की नाही हे प्रत्यक्ष मतमोजणीनंतरच समजेल. श्री. भुसे यांनीही उत्तर महाराष्ट्राची जबाबदारी असताना तालुक्यातील गट अन्‌ गण पिंजून काढला. गावोगावी भेटी दिल्या. यातूनच आगामी विधानसभेची तयारीही सुरु झाली आहे.

गेल्या वेळी अद्वय हिरे यांनी नांदगाव विधानसभा मतदारसंघाला पसंती दिली होती. यावेळी त्यांचा ओढा मालेगाव बाह्यकडे आहे. मात्र त्यांचे बंधू अपूर्व हिरे नाशिक पश्‍चिममधून निश्‍चित असल्याने दोघे एकाच वेळी निवडणूक लढवतील की नाही याबाबत तर्कवितर्क सुरु आहेत. मालेगाव शहरातील मताधिक्य कमी झाले तरच भाजपचे डाॅ सुभाष भामरे यांना निवडणुकीत लाभदायक ठरणार आहे. ते केवळ दादा भुसे व त्यांच्या सहका-यांच्या परिश्रमाला मतदार किती व कसा प्रतिसाद मराठीतून देतात यावर ठरेल. अशा स्थितीत शिवसेनेचे राज्यमंत्री दादा भुसे डाॅ भामरेंसाठी तारणहार ठरतील.

Web Title : Will Dada Bhuse be the savior of Subhash Bhamare?

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mahadev Betting App Case : २००० सीम कार्ड, १७०० बँक खाते, ३२ आरोपी आणि १५००० कोटींचा स्कॅम; काय आहे महादेव बेटिंग अॅप घोटाळा?

Why Aamir Khan Called Mr. Perfectionist : आमिर खानला ‘बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट’चा टॅग कसा मिळाला?; शबाना आझमीचं नाव सांगत म्हणाला...

Shirur Crime: भावकीच्या वादातून दोन गटात तुफान राडा.. बेदम मारहाणीत तरुणाचा मृत्यू; शिरुर तालुका हादरला

Supreme Court On Sandeshkhali Case : संदेशखाली प्रकरणी CBI चौकशी सुरूच राहणार; SC कडून बंगाल सरकारला झटका

Gold Wearing Benefits: सोने -चांदीचे दागिने घालताना घ्या ही काळजी, नाहीतर...

SCROLL FOR NEXT