बातम्या

प्रिया दत्त निवडणूक लढवणार?

सकाळ न्यूज नेटवर्क

मुंबई : येथील उत्तर पश्चिम मतदारसंघातून काँग्रेसकडून प्रिया दत्त पुन्हा निवडणूक लढवायला तयार होतील अशी शक्यता आहे. काल काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी सभेच्या व्यासपीठावरच दत्त यांच्यासह काँग्रेसच्या अन्य नेत्यांशी चर्चा करुन दिलजमाई करण्याचा प्रयत्न केला आहे.

आपण निवडणूक लढवणार नाही, अशी घोषणा प्रिया दत्त यांनी यापूर्वी केली होती. मात्र, त्यांनीच ही निवडणूक लढवावी, असा काँग्रेसमधून आग्रह होता. मुंबई प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांच्या कार्यपद्धतीवरून मुंबई काँग्रेसमध्ये दोन गट पडले आहेत.

मात्र, काल येथे झालेल्या सभेत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी सभेच्या व्यासपीठावर मुंबई काँग्रेसच्या नेत्यांशी चर्चा करत पक्षातले वाद आणि गटबाजी मिटवण्याचे स्पष्ट आदेश दिले आहेत. या निवडणुकीत हेवेदावे विसरुन सर्वांनी एकदिलाने काम करावे, असे राहुल गांधी यांनी मुंबईतल्या नेत्यांना सांगितले आहे.

काल सभा सुरू असताना राहुल गांधी यांचे मुलाखत सत्र सुरू होते. संजय निरुपम यांचे भाषण सुरू असताना मुंबईतील संभाव्य उमेदवारांना बोलवून राहुल गांधी यांनी त्यांच्याशी चर्चा केली.

सुरूवातीला प्रिया दत्त यांना बाजूला बसवून त्यांनी चर्चा केली. त्यानंतर एकनाथ गायकवाड, भालचंद्र मुणगेकर, कृपाशंकर सिंह, जनार्धन चांदूरकर, मिलिंद देवरा यांच्याशी त्यांनी चर्चा केली. संजय निरुपम यांचे भाषण सुरु असताना राहुल गांधी यांनी या नेत्यांना बोलावून घेऊन त्यांचे म्हणणे ऐकले. निरुपम यांचे भाषण सुरु असताना गांधी यांनी मिलिंद देवरा यांना आपल्या शेजारी बसण्यासाठी बोलावून घेतले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today's Marathi News Live : कोल्हापुरातील दोन्ही जांगावरील रणनीतीवर शिंदे, फडणवीसांची बैठक

Skin Care Tips: मान काळी झालीये? या घरगुती उपायांनी करा स्वच्छ

Jai Shree Ram Written in Exam : उत्तरपत्रिकेत 'जय श्रीराम' लिहिलं, विद्यार्थी ५६ टक्क्यांनी पास; नेमका घोळ कसा झाला उघड?

Hemant Godse On Onion News | खासदार हेमंत गोडसेंनी मानले सरकारचे आभार

Kalyan Crime : वीज बिल भरण्याबाबत फोन येतो का? लगेच व्हा सावध!; आजोबांचे १ लाख ४४ हजार रुपये काही सेकंदातच गायब

SCROLL FOR NEXT