बातम्या

वर्षा बंगल्याचं पाणी बिल थकलं; महापालिकेच्या लेखी मुख्यमंत्री डिफॉल्टर

सकाळ न्यूज नेटवर्क

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानाचं पाणी बिल थकल्यानं मुंबई महापालिकेने त्यांना डिफॉल्टर घोषित केलंय. पाणी बिलापोटी तब्बल 7 लाख 44 हजार 981 रुपयांची थकबाकी मुख्यमंत्र्यांच्या नावे आहे. विशेष म्हणजे फक्त मुख्यमंत्रीच थकबाकीदार नसून राज्याच्या इतर मंत्र्यांकडेही कोट्यावधींची थकबाकी असल्याची बाब माहिती अधिकारातून उघड झाली आहे. 

मुख्यमंत्र्यांचं वास्तव्य असलेल्या वर्षा या निवासस्थानाची थकबाकीची रक्कम आहे 7 लाख 44 हजार 981 रुपये. तर वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवारांचं वास्तव्य असलेल्या देवगिरी निवासस्थानाच्या नावे 1 लाख 45 हजार रुपये थकलेत. याशिवाय संसदीय कार्यमंत्री विनोद तावडेंच्या सेवासदन निवासस्थानाची 1 लाख 61 हजार रुपयांची थकबाकी असून महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडेंच्या रॉयलस्टोन या बंगल्याची थकबाकी आहे 35 हजार 033 रुपये. परिवहन मंत्री दिवाकर रावतेंच्या मेघदूत या निवासस्थानाचे 1लाख 5हजार रुपये थकलेत. तर उद्योगमंत्री सुभाष देसाईंच्या पुरातन या निवासस्थानाचे 2 लाख 49 हजार रुपये थकलेत. यांच्यासह सार्वजनिक बांधकाम एकनाथ शिंदे यांच्या नंदनवन बंगल्याच्या नावे 2 लाख 28 हजार रुपये, ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळेंच्या जेतवन या बंगल्याच्या नावे 6 लाख 14 हजार रुपये, पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकरांच्या मुक्तागिरीच्या नावे 1 लाख 73 हजार रुपये, जलसंपदा मंत्री गिरीश महाजनांच्या शिवनेरी बंगल्याच्या नावे 1लाख 54 हजार रुपये थकीत आहेत. याशिवाय सह्याद्री या शासकीय अतिथीगृहाची पाणी बिलापोटी 12 लाख 04 हजार रुपये थकीत आहेत. 

याबाबत मुख्यमंत्री कार्यालयाने दिलेल्या खुलाशानुसार शासकीय निवासस्थानांची पाणी बिले नोव्हेंबर 2018 मध्येच भरण्यात आली होती. मात्र मे 2019 मध्ये प्राप्त झालेल्या पाणी बिलांच्या रकमेत तफावत आल्यामुळे बिल भरणा केलेला नाही. संपूर्ण हिशोब केल्यानंतर ही देयके भरण्याची कार्यवाही तात्काळ सुरू करण्यात येत असल्याचं सार्वजनिक बांधकाम विभागाने मुख्यमंत्री कार्यालयाला कळवलंय.

Webtitle : marathi news maharashtra politics water water bill on CM bungalow not paid 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

TRP Rating Of Marathi Serial : तेजश्री प्रधानच्या ‘प्रेमाची गोष्ट’चा टीआरपी घसरला; पहिल्या क्रमाकांवर कोणती मालिका?

Viral News: बायकोने नवऱ्याला त्याच्या प्रेयसीसोबत रंगेहाथ पकडलं, केली धो-धो धुलाई; VIDEO व्हायरल

Sonal Chauhan: बोल्ड सोनलचा सोज्वळ साज; जन्नत गर्लचा 'खास' अंदाज!

CSK vs SRH,IPL 2024: हैदराबादकडून पराभवाचा बदला घेण्यासाठी CSK उतरणार मैदानात; अशी असू शकते दोन्ही संघांची प्लेइंग ११

Yavatmal News : लग्नाचा स्वागत समारंभ आटोपून येणाऱ्या पाहुण्यांवर काळाचा घाला; ट्रकच्या धडकेत ४ ठार, १० जण जखमी

SCROLL FOR NEXT