बातम्या

भारतरत्न लता मंगेशकर यांचं धोनीच्या निवृत्तीवर भाष्य; दिदींनी केलं ट्विट 

सकाळ न्यूज नेटवर्क

मुंबई : गानसम्राज्ञी आणि भारतरत्न लता मंगेशकर यांनी भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीने निवृत्ती घेऊ नये, अशा आशयाचे ट्विट आज (गुरुवार) केले आहे.

सध्या क्रिकेट विश्वात धोनीच्या निवृत्तीविषयी चर्चा सुरू आहेत. विश्वकरंडक स्पर्धेच्या अंतिम सामन्यावेळी धोनी निवृत्त होणार? अशी चर्चा सुरू होती. न्यूझीलंडविरुद्धच्या पराभवानंतर धोनी चाहत्यांना धक्का देणार का? अशी चर्चा सुरु असताना लता दीदींनी धोनीला भावनिक साद घातली आहे. या विषयावर अजून कोणतेही अधिकृत वृत्त आलेले नाही. 

काल (बुधवार) न्यूझीलंडविरुद्धचा सामना संपल्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेतही कर्णधार विराट कोहलीने धोनीने निवृत्तीविषयी अजूनपर्यंत कोणतीही माहिती दिली नसल्याचे स्पष्ट केले. या चर्चेवर लता दीदींनीही ट्विटरवर आपले मत मांडत धोनीने निवृत्तीचा निर्णय घेऊ नये, असे म्हटले आहे. 

लता दीदींनी ट्विटमध्ये लिहिले आहे की, ''नमस्कार एम.एस. धोनीजी, तुम्ही निवृत्ती घेण्याचा विचार करत आहात, असे ऐकायला मिळत आहे. कृपया तुम्ही असा विचार करू नका. देशाला तुमच्यासारख्या खेळाडूची गरज आहे. मला वाटते की, निवृत्तीचा विचारच तुम्ही करू नये. काल भलेही आपण जिंकू शकलो नसेल, पण आपण हरलेलो नाही.'' 

लता दीदींनी प्रसिद्ध गीतकार गुलजार यांनी क्रिकेटच्या पार्श्वभूमीवर लिहिलेले एक गाणेही भारतीय संघाला समर्पित केले आहे.

WebTitle : marathi news lata mangeshkar tweets regarding retirement of mahendrasingh dhoni


 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Naseem Khan: काँग्रेसची भूमिका छळाची, ४८ पैकी एकाही जागेवर मुस्लिम उमेदवार नाही; नसीम खान कडाडले

Video: Taarak mehta ka ooltah chashmah मालिकेतील प्रसिद्ध अभिनेत बेपत्ता झाल्यानं खळबळ!

Taiwan Earthquake News : ६.१ तीव्रतेच्या भूकंपाने तैवान पुन्हा हादरलं; नागरिकांमध्ये घबराट

Tharla Tar Mag: सायली अर्जुन खरे नवरा- बायको नाहीत...; चैतन्यने सांगितलं साक्षीला सत्य

Nashik Loksabha: नाशिक लोकसभेत नवा ट्वीस्ट! महंत अनिकेत शास्त्रीही निवडणुकीच्या रिंगणात; भाजपकडून उमेदवारी मिळणार असल्याचा दावा

SCROLL FOR NEXT