बातम्या

JNU विद्यापीठात पुन्हा उसळला हिंसक राडा, हल्ल्यात 20 विद्यार्थी जखमी

सकाळ न्यूज नेटवर्क


नवी दिल्ली : दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठ संकुलात काल संध्याकाळी JNUSU आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या विद्यार्थ्यांमध्ये हाणामारी झाली. विद्यार्थी संघटनांमध्ये झालेल्या राड्यात शिक्षिकेसह 20 विद्यार्थी जखमी झालेत. चेहरे झाकलेल्या अज्ञात हल्लेखोरांनी येऊन लाठ्याकाठ्यांनी हल्ला केला.

हा हल्ला अभविपकडून करण्यात आल्याचं बोललं जातंय. दरम्यान JNUSU आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या विद्यार्थी संघटनांमधील धुमश्चक्रीनंतर, विद्यापीठ परिसरात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय. जखमींना उपचारासाठी दिल्लीतल्या एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. प्रियंका गांधींनीही जखमी विद्यार्थ्यांची रात्री उशिरा भेट घेतली. या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर तोडफोडही करण्यात आली. गाड्यांच्या काचा फोडण्यात आल्या. या घटनेचे प्रत्यक्षदर्शींनी काढलेले काही व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. 

हल्ल्याच्या आधी काही मेसेज व्हायरल

दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठात (जेएनयू) गुंडांकडून विद्यार्थ्यांवर झालेल्या हल्ल्यापूर्वी व्ह़ॉट्सऍपवर काही मेसेज व्हायरल झाल्याचे समोर आले आहे.

इंडियन एक्स्प्रेस या वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार, जेएनयूमध्ये रविवारी रात्री गुंडांनी घुसून विद्यार्थ्यांवर केलेल्या हल्ल्यापूर्वी 'देशद्रोह्यांना झोडून काढा' असे आणि यासारखे काही मेसेज व्हायरल झाल्याचे समोर आले आहे. त्यानंतर काही वेळातच विद्यार्थ्यांवर काही मुखवटाधारी गुंडांनी विद्यार्थी आणि शिक्षकांना काठ्या आणि लोखंडी रॉडने मारहाण केली. यामध्ये विद्यार्थी संघटनेची अध्यक्ष आईशी घोष हिच्यासह अठरा जण गंभीर जखमी झाले असून, त्यांना उपचारासाठी अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेत (एम्स) दाखल करण्यात आले आहे. 

हिंसाचाराचे आवाहन करणाऱ्या सहा जणांपैकी तीन जणांच्या मोबाईलवरून व्हॉट्सऍपवर हे मेसेज पाठविण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे. 'एकदा आरपार करण्याची गरज आहे, त्यांना आता मारणार नाही तर कधी मारणार', 'लेफ्ट टेरर डाऊन डाऊन', 'त्या देशद्रोह्यांना मारून आनंद झाला' असे काही मेसेज व्हायरल झाल्याने हा हल्ला पूर्वनियोजित होता का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

या घटनेचा देशभरातून विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटना आणि तज्ज्ञांनी कठोर शब्दांत निषेध करण्यात येत आहे. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या (एबीव्हिपी) कार्यकर्त्यांनीच नियोजनबद्ध पद्धतीने हा हल्ला घडवून आणल्याचा आरोप डाव्या विद्यार्थी संघटनांनी केला आहे. या प्रकरणी गृहमंत्री अमित शाह यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. दरम्यान, या हिंसाचार प्रकरणी आमच्याकडे अनेक तक्रारी आल्या असून लवकरच गुन्हे दाखल केले जातील असे स्पष्टीकरण दिल्ली पोलिसांनी दिले आहेत. जामिया समन्वय समितीने (जेसीसी) देखील दिल्ली पोलिसांकडे विद्यापीठात धिंगाणा घालणाऱ्या आणि दहशत पसरवणाऱ्या गुंडांची ओळख पटवून त्यांच्यावर तत्काळ एफआयआर दाखल करण्याची मागणी केली आहे.

Web Title: JNU attack by ABVP

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune News | पुण्यातील चाकण परिसरात गॅस टँकरचा स्फोट

Gold Silver Rate Hike : सोने-चांदीच्या दरात मोठी वाढ; वाचा महाराष्ट्रातील तुमच्या शहरातील आजचा भाव

Nashik Loksabha: मतदानाच्या पार्श्वभूमीवर नाशिक पोलीस अलर्ट; तब्बल ३ हजार ५१८ गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई

Sangali News: सांगली, पुण्यासह ५ रेल्वेस्थानक बॉम्बने उडवून देण्याची धमकी; संशयित आरोपीला मुंबईतून अटक

Pune News: चाकण-शिक्रापूर मार्गावर गॅस टँकरचा भीषण स्फोट; एक किलोमीटरपर्यंतचा परिसर हादरला, घरांची पडझड VIDEO

SCROLL FOR NEXT