बातम्या

गुगलकडून केरळला 7 कोटींची मदत  

सकाळ न्यूज नेटवर्क

केरळमध्ये पडणाऱ्या मुसळधार पाऊस आणि त्यामुळे आलेल्या पुरामुळे जनजीवन विस्कळीत झाले. या नैसर्गिक आपत्तीनंतर देशभरातून 'मदतीचा हात' मिळत आहे. त्यानंतर आता केरळच्या पुनर्वसनासाठी गुगलकडून 7 कोटींची मदत जाहीर करण्यात आली आहे. 

याबाबत गुगल इंडियाचे उपाध्यक्ष राजन आनंदन यांनी सांगितले, की केरळमधील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी गुगलर्स आणि Google.org कडून 7 कोटींचा निधी देण्यात येणार आहे. 'गुगल क्राइसिस रिस्पॉन्स टीम'ने केरळमधील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी अनेक उपाययोजना केल्या आहेत. याशिवाय पुरात अडकलेल्या लोकांचा शोध घेण्यासाठी गुगलने 'गुगल पर्सनल फाइंडर' टूलची निर्मिती केली आहे, अशी माहिती आनंदन यांनी दिली.

दरम्यान, केरळमध्ये आलेल्या पुरामुळे आत्तापर्यंत चारशेहून अधिक जणांचा मृत्यू झाला. तर राज्यातील सुमारे 22 लाख नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहे.
 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

PM Narendra Modi: अभिजीत पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घेतली भेट, देश आणि राज्यातील विविध मुद्द्यांवर झाली चर्चा

India T20 World Cup Squad : किंग कोहलीवर विश्वास कायम, पंत आणि चहलचंही कमबॅक; टी-20 वर्ल्डकप टीमबाबत ५ महत्वाचे मुद्दे

PM Narendra Modi आणि एपी ग्लोबालेचे संस्थापक अभिजीत पवार यांची नवी दिल्लीत भेट

Explainer : लोकल गर्दीमुळे आणखी किती रियांचे बळी जाणार? डोंबिवली - कोपरदरम्यानच घटना का घडताहेत?

MI Vs LSG : लखनौच्या गोलंदाजांसमोर मुंबईचा संघ गडगडला; लखनौसमोर १४५ धावांचं लक्ष्य

SCROLL FOR NEXT