बातम्या

भारतात आतापर्यंत 2 हजार 69 जणांना कोरोनाची लागण,तर 53 जणांचे मृत्यू

मोहिनी सोनार

भारतात कोरोनाचा संचार झाल्यापासून परिसथिती गंभीर बनत चालली आहे. महाराष्ट्रासह संपूर्ण देशात कोरोनाचे रुग्ण वाढतच चालले आहेत. दिवसेंदिवस वाढती आकडेवारी समोर येतेय. त्यामुळे आरोग्य यंत्रणाही हबकल्याआहे. 

दरम्य़ान, भारतात आतापर्यंत २ हजार ६९ जणांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलंय. तर कोरोनामुळे ५३ जणांचा मृत्यू झाला असून १५५ लोकं ठणठणीत बरे झाल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाने दिलीय. दरम्यान महाराष्ट्र आणि केरळमध्ये कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आढळलेत. तर दिल्लीतील कोरोनाग्रस्तांची आकडेवारीही चिंताजनक असल्याचं समोर आलंय.

कोरोनाला वेळीच नाही, रोखलं तर आपली स्थिती सुद्धा इटलीसारखी व्हयला वेळ लागणार नाही. तिथे आतापर्यंत लाखो कोरोनाचे रुग्ण आहेत तर हजारोंच्या संख्येत मृत्यूही होतायत. यामुळे आपण वेळीच सतर्क होणं खूप महत्वाचं आहे. सोशल डिस्टन्सींगचं पालन करुन योग्य ती काळजी घेणं महत्वाचं आहे. मात्र बऱ्याच ठिकाणी या सर्व गोष्टींचा फज्जा उडताना पहायला मिळतोय. कुठे तर पोलिसांवरच हल्ले होताना दिसताय. त्यामुळे नागरिकांनी स्वत: स्वत:चा जीव कसा वाचवता येईल याकडे लक्ष देणं गरजेचं आहे.

Web Title -  marathi news corona update in india - 2069 corona patient and 53 deaths in country
 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Anant Chaturdashi 2025 live updates : अलका टॉकीज चौकात "श्रीमंत" दाखल

Ganesh visarjan 2025 : गणपतीचे विसर्जन करताना विपरीत घडलं, तीन तरुण पाण्यात वाहून गेले

Pune News: पुण्यात दगडूशेठ गणपतीची महाआरती पाहा VIDEO

ITR Filing : टॅक्स रिफंड परताव्याचा फॉर्म अडकून पडलाय? मग 'या' गोष्टी एकदा तपासाच

Akola Accident: गणेश विसर्जन करून परताना भक्तांवर काळाचा घाला; तरुणाचा जागीच मृत्यू

SCROLL FOR NEXT