बातम्या

भाजपने राखली पालघर मधली जागा.. राजेंद्र गावित पालघरमधून विजयी

सकाळ न्यूज नेटवर्क

मुंबई: पालघर लोकसभा पोटनिवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे राजेंद्र गावित 44589 मतांनी विजयी झाले आहेत. पालघर लोकसभा पोटनिवडणुकीच्या मतमोजणीत सुरुवातीपासून भाजपने आघाडी घेतली होती. पहिल्या फेरीपासून 14 फेऱ्य़ांमध्ये भाजपचे राजेंद्र गावित यांनी आघाडी घेतली होती. शिवसेनेचे श्रीनिवास वनगा ही सुरुवातीला तिसऱ्या स्थानावर होते, नंतर ते दुसऱ्या क्रमांकावर आले होते. अखेर गावित विजयी झाले.

पालघरमध्ये 28 मे रोजी लोकसभेसाठी पोटनिवडणूक झाली होती. शिवसेना-भाजपने पालघर पोटनिवडणूक प्रतिष्ठेची केल्यामुळे सर्वांचे लक्ष या निकालाकडे लागले होते. शिवसेना आणि भाजपने याठिकाणी प्रतिष्ठेची लढाई बनविली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या साम, दाम, दंड, भेद या ऑडिओ क्लिपमुळे ही निवडणूक चांगलीच गाजली होती. शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनीही प्रचाराची राळ उडविली होती.

पालघर लोकसभा पोटनिवडणुकीत भाजपाकडून काँग्रेसमधून आलेले राजेंद्र गावित, शिवसेनेकडून श्रीनिवास वनगा, काँग्रेसकडून दामोदर शिंगडा, माकपाकडून किरण गहला, बहुजन विकास आघाडीकडून बळीराम जाधव आणि इतर चार अपक्ष उमेदवार होते. भाजपचे खासदार चिंतामण वनगा यांच्या निधनामुळे पालघरमध्ये पोटनिवडणूक झाली.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Election: महायुतीचा ५ जागांचा तिढा सुटला? पण नाशिकचा सस्पेन्स कायम

Dombivli Local Train Accident : डोंबिवलीतील तरुणीचा लोकलमधून पडून दुर्दैवी मृत्यू

Today's Marathi News Live : आदित्य ठाकरेंचा उद्या श्रीकांत शिंदेंच्या मतदारसंघात रोड शो

Supriya Sule on Onion | कांदा निर्यातीवर सुळे यांचा केंद्र सरकारला सवाल

Vasant More Election symbol : झोप उडवणार! वसंत मोरेंना निवडणूक चिन्ह मिळताच विरोधकांना दिला थेट इशारा

SCROLL FOR NEXT