बातम्या

कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या 13 आजी-माजी नगरसेवकांचा भाजपात प्रवेश

सकाळ न्यूज नेटवर्क

मिरज - महापालिका निवडणुकीत भारतीय जनता पक्षाकडून उमेदवारीसाठी इच्छुक असलेले १३ आजी-माजी नगरसेवकांनी आज मुंबईत भाजपमध्ये प्रवेश केला.

प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत हा प्रवेश झाला. यामध्ये माजी महापौर व काँग्रेसचे नगरसेवक विवेक कांबळे, राष्ट्रवादीचे नगरसेवक सुरेश आवटी, त्यांचे चिरंजीव नगरसेवक निरंजन आवटी, संदीप आवटी, नगरसेवक शिवाजी दुर्वे यांच्यासह माजी नगरसेवक आनंदा देवमाने, महादेव कुरणे, विठ्ठल खोत, ‘मनसे’चे दिगंबर जाधव, शेतकरी संघटनेचे संभाजी मेंढे, उद्योजक गणेश माळी, भीमराव बुधनाळे, महेंद्र पाटील (कुपवाड) आणि अमोल सूर्यवंशी यांच्यासह अन्य वजनदार 
कार्यकर्त्यांचाही यात समावेश आहे.

सांगलीत होणाऱ्या प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीवेळी या सगळ्यांचा हा पक्षप्रवेश निश्‍चित होता; पण ही बैठक रद्द झाल्याने हा कार्यक्रम मुंबईत करण्याचे ठरले. 

आधी पक्षप्रवेश; मगच उमेदवारी
महापालिकेच्या येत्या निवडणुकीत भाजपकडून उमेदवारीसाठी इच्छुक असलेल्यांना अधिकृत पक्षप्रवेश केल्याशिवाय उमेदवारी द्यायची नाही, अशी भूमिका आमदार सुरेश खाडे यांनी घेतली. परिणामी ‘मिरज पॅटर्न’ मधील इच्छुक कोंडीत सापडले. त्यापैकी काहींनी आज भाजपमध्ये प्रवेश केल्याने त्यांची उमेदवारी निश्चित समजली जात आहे. 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ankita Lokhande: हृदयस्पर्शी कॅप्शनसह अंकिता लोखंडेने पतीसोबतचा रुग्णालयातील फोटो केला शेअर

Maharashatra Elction: कोकणात ठाकरे विरुद्ध ठाकरे लढाई; उद्धव आणि राज ठाकरेंच्या सभांचा झंजावात

Petrol वर नाही CNG वर धावणार Bajaj ची नविन बाईक, Platina पेक्षा देणार जास्त मायलेज

Poco X6 5G नविन अवतारात लॉन्च झाला, मिळणार जबरदस्त फीचर्स

Farmers Protest: पंजाबमध्ये शेतकऱ्यांचे रेल रोको आंदोलन, 3 दिवस 46 गाड्या रद्द; 100 मार्ग बदलले

SCROLL FOR NEXT