बातम्या

हे आहे 'या' सहा मंत्र्यांच्या हकालपट्टीचं कारण..

सकाळ न्यूज नेटवर्क

मुंबई: राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तारात नवीन 13 मंत्र्याचा आज(ता.16) समावेश करण्यात आला. तर जुन्या सहा मंत्र्यांना नारळ दिला. काही मंत्र्यांना नारळ देण्याची कारणेही तशीच आहेत. गृह निर्माणमंत्री प्रकाश महेता यांना भ्रष्टाचाराची प्रकरणे भोवली असून त्यांच्या कुकर्माच्या सुरस कहाण्या माध्यमांनी चालवल्या. लोकायुक्तांनी ताशेरे ओढल्यावर श्रेष्ठींचे संबंधही कामी आले नाहीत अन् राजीनामा द्यावा लागला.
 
अदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा हे संघ परिवारातले ज्येष्ठ स्वयंसेवक पण नंतर ते अनागोंदित रमले, आदिवासी शाळातील व्यवहारावर अंकुश लावता आला नाही. प्रकृती साथ देत नाही अशी कारणे देत आता थेट घरी बसावे लागणार आहे. सोबतच सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी तर दलित शिष्यवृत्तींची सवलत आपल्या मुलीला अन सचिवासारख्या उच्चपदस्थाला दिली. कांबळे काहीही न करता बडोलेंशी वादात रमले. एका प्रकरणात गुन्हाही नोंदवला गेला या कारणांनी दोघांचेही मंत्रिपद गेले. अंबरीश अत्राम तरूण पण बैठकांनाही हजर नसायचे म्हणून त्यांनाही नारळ देण्यात आला. प्रवीण पोटे निष्प्रभ ठरले आणि उशीरा का होईना पण मुख्यमंत्र्यांनी सगळ्यांना घरी बसवले. मोठे आरोप असलेले काही मोठे नेते मात्र अद्यापही मंत्री आहेत. अशा एका ना अनेक कारणांमुळे राजकुमार बडोले, प्रकाश महेता, दिलीप कांबळे, प्रवीण पोटे, अंबरीश आत्राम, विष्णू सावरा या मंत्र्यांना राजीनामे द्यावे लागले.

दरम्यान, आगामी विधानसभा निवडणूक ऐन तोंडावर आली असताना गेल्या पावणेपाच वर्षांपासून रखडलेल्या राज्यमंत्रिमंडळाच्या विस्ताराला अखेर आज (ता. 16) मुहूर्त मिळाला. राजकीय लाभाचा विचार करून पक्षांतरे करणाऱ्या आयारामांना मंत्रिपदाचे नजराणे देण्यात आले असून विधानसभेतील माजी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे- पाटील यांना भाजपच्या कोट्यातून, तर जयदत्त क्षीरसागर यांना शिवसेनेकडून मंत्रिपद देण्यात आले आहे. विखे क्षीरसागरांसह एकूण 13 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली.

Web Title: BJP Expulsion 6 ministers in cabinet

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today's Marathi News Live : शिरुर लोकसभा मतदारसंघात अपक्ष उमेदवाराला तुतारी चिन्ह

Women Rights At Workplace: ऑफिसमध्ये महिलांवर अन्याय होतोय? या कायद्यांच्या मदतीने करु शकता तक्रार

Kolhapur News: कळंबा कारागृहात तब्बल ७५ कैद्यांकडे मोबाईल सापडले; तुरुंग अधिकाऱ्यांसह ११ पोलीस निलंबित

Navi Mumbai Crime : नवी मुंबईतून 11 नायजेरियन व्यक्तींना अटक; 16 कोटी रुपयांचे ड्रग्ज जप्त

Bus Truck Accident At Rahud Ghat: मुंबई आग्रा महामार्गावर भीषण अपघात; बसचा टायर फुटून ६ जण दगावल्याची भीती

SCROLL FOR NEXT