बातम्या

धक्कादायक : पतीस सोडायला गेली, जगच सोडून गेली!

सकाळ न्यूज नेटवर्क

औरंगाबाद - कंपनी कामगारांची वाहतूक करणाऱ्या एका बसने दुचाकीस्वार महिलेस चिरडल्याची घटना शनिवारी (ता.18) सकाळी साडेआठच्या सुमारास रामनगरातील सह्याद्री हॉस्पिटलसमोर घडली. या भीषण अपघातात ललिता शंकर ढगे (39, रा. कासलीवाल पूर्व, चिकलठाणा विमानतळासमोर) या महिलेचा जागीच मृत्यू झाला. या अपघातानंतर बसचालकाने बससह घटनास्थळावरून धूम ठोकल्याची माहिती मुकुंदवाडी पोलिसांनी दिली. 

वाळूज एमआयडीसी भागातील बडवे इंजिनिअरिंग कंपनीत व्यवस्थापक म्हणून शंकर ढगे हे नोकरीला आहेत. शनिवारी सकाळी साडेसातच्या सुमारास त्यांना कंपनीच्या बसमध्ये बसविण्यासाठी ललिता यांनी चिकलठाणा परिसरातील मुख्य रस्त्यावर दुचाकीने सोडले. तेथून ललिता या पुन्हा घरी गेल्या. पुढे सकाळी सव्वाआठच्या सुमारास जीमला जाण्यासाठी त्या दुचाकीने (एमएच-20, सीसी- 9300) घराबाहेर पडल्या. जालना रोडवरील रामनगरजवळ असलेल्या सह्याद्री हॉस्पिटलसमोर सध्या इंटरनेट केबलचे काम सुरू आहे. या केबलमध्ये ललिता यांच्या दुचाकीचे समोरील चाक अडकले. त्यामुळे तोल जाऊन ललिता रस्त्यावर पडल्या. तेवढ्यात पाठीमागून आलेल्या बसचालकाने त्यांना समोरच्या चाकाखाली चिरडले.

डोक्‍यावरून बसचे चाक गेल्याने ललिता यांचा जागीच मृत्यू झाला. हा भयंकर अपघात पाहून परिसरातील नागरिकांनी धाव घेतली.  दरम्यान, अपघात घडताच बसचालकाने बससह घटनास्थळावरून धूम ठोकली. अपघाताची माहिती मिळताच माजी महापौर भगवान घडामोडे यांनीही धाव घेतली. यानंतर मुकुंदवाडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत ललिता यांचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी घाटी रुग्णालयात नेला. याप्रकरणी मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

रस्त्यालगतच्या वायर कोण उचलणार? 
सध्या शहरातील विविध भागांत इंटरनेटसह अन्य केबल वायर लोंबकाळत तर काही ठिकाणी रस्त्यावर पडलेले पाहायला मिळते. रस्त्याच्या कडेला असलेल्या वायरमुळेही छोटे-छोटे अपघात झाल्याचे समोर आलेले असतानाही महापालिका हे वायर का दूर करीत नाहीत, की ही त्यांची जबाबदारी नाही? असे प्रश्‍न यानिमित्ताने उपस्थित होत आहेत. शहराच्या अनेक भागांतील रस्त्याच्या कडेला पडलेले असे वायर अजून किती जणांचा बळी घेण्याची वाट पाहणार आहे का? असा संतापजनक सवाल नागरिक विचारत आहेत.  

Web Title aurangabad women killed bus accident ramnagar 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Petrol वर नाही CNG वर धावणार Bajaj ची नविन बाईक, Platina पेक्षा देणार जास्त मायलेज

Poco X6 5G नविन अवतारात लॉन्च झाला, मिळणार जबरदस्त फीचर्स

Farmers Protest: पंजाबमध्ये शेतकऱ्यांचे रेल रोको आंदोलन, 3 दिवस 46 गाड्या रद्द; 100 मार्ग बदलले

Gadchiroli Crime: धक्कादायक! जादूटोणाच्या संशयातून गावकऱ्यांनी महिलेसह दोघांना जिवंत जाळलं

Maharashtra Politics: प्रणितीसह सुशीलकुमार शिंदे भाजपच्या वाटेवर? प्रकाश आंबेडकरांच्या दाव्याने खळबळ

SCROLL FOR NEXT