बातम्या

अमित शहांच्या कारवाईनं घाबरली आयएसआय

सकाळ न्यूज नेटवर्क

मोदी सरकार दोनचा कार्यकाळ सुरू होऊन महिनादेखील झालेला नाही. जम्मू-काश्मीरमधल्या दहशतवादी टोळ्यांची पळता भुई थोडी झालीय. केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी या दहशतवाद्यांचा बंदोबस्त करण्यासाठी खास ऍक्शन प्लान तयार केलाय. त्यामुळे पाकिस्तान चांगलंच धास्तावलंय. पाकिस्तानची गुप्तचर यंत्रणा आयएसआयनं आता फुटीरतावाद्यांना हाताशी धरून नवी संघटना बांधण्याचं काम सुरू केल्याची माहिती समोर येतीय. 

सुत्रांच्या माहितीनुसार या नव्या संघटनेचा प्रमुख म्हणून इरशाद अहमद मलिकचं नाव पुढे येतय. इरशादबद्दल असं सांगितलं जातं की तो लष्करचा दहशतवादी आहे. त्यामुळे नव्या संघटनेत लष्कराच्या इतर दहशतवाद्यांनाही सामावून घेतलं जाईल. काश्मीर भागात भारतीय लष्कर आणि सुरक्षा यंत्रणांविरोधात तीव्र स्वरूपाची आंदोलनं छेडून घातपात घडवणं ही जबाबदारी या नव्या ग्रुपची असेल..

गृह मंत्री का पदाची धुरा सांभाळताच अमित शहा दहशतवादाविरोधात सक्रिय झालेत. जम्मू-कश्मीरवर त्यांनी विशेष लक्ष केंद्रीत केलं.. काही दिवसांपूर्वीच त्यांनी इथल्या सुरक्षादलांशी आणि राज्यपाल सत्यपाल मलिक यांच्यासोबत चर्चा केली. त्यानंतर दहशतवाद्यांविरोधत झिरो टॉलरन्स निती सुरूच राहिल असंही अमित शहा यांनी स्पष्ट केलं होतं.

दहशतवादी संघटनांविरोधात मोहिम याशिवाय गेल्या काही दिवसात गृहमंत्रालयानं दहशतवादी संघटना आणि टेरर फंडिग करणाऱ्यांविरोधात आक्रमक पवित्रा घेतलाय. दहशतवाद्यांना आर्थिक रसद पुरवणाऱ्या मर्सरत आलम, शब्बीर शाह, आसिया अंद्राबी यांची रवानगी तुरूंगत झालीय. त्यामुळे काश्मीरात दहशतवादी कारवाया करणाऱ्या संघटनांचं कंबरडं मोडलंय.

याशिवाय भारतीय लष्करानं जम्मू-कश्मीरमध्ये ऑपरेशन ऑलआऊटट हाती घेतलंय. आतापर्यंत 100 पेक्षा जास्त दहशतवादी मारले गेलेत. यात लश्कर-ए-तैयबा आणि हिज्बुल मुजाहिदीनच्या दहशतवाद्यांची संख्या जास्त आहे..काही दिवसांपूर्वीच सुरक्षादलानं जाकिर मूसालाही ठार केलं. जाकिर मूसा, दहशतवाद्याचां पोस्टर बॉय मानला जात होता. 

पण आता या सगळ्यांची पाळमुळं खोदून त्यांना यमसदनी धाडण्याचं काम देशाची सुरक्षायंत्रणा करतीय. त्यामुळे पाकिस्तानसाठी हा मोठा धक्का मानला जातोय. 

WebTitle : marathi news amit shah mission all out jammu and kashmir 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Horoscope Today: आजचे राशिभविष्य, मेषसह ४ राशींसाठी ‘शनिवार’ भाग्याचा; फक्त 'या' गोष्टीची घ्या काळजी

Cibil Score: कमी झालेला सिबिल स्कोअर ७०० पार कसा कराल? 'या' टिप्स सुधारतील तुमचा स्कोअर

Ankita Lokhande: हृदयस्पर्शी कॅप्शनसह अंकिता लोखंडेने पतीसोबतचा रुग्णालयातील फोटो केला शेअर

Maharashatra Elction: कोकणात ठाकरे विरुद्ध ठाकरे लढाई; उद्धव आणि राज ठाकरेंच्या सभांचा झंजावात

Petrol वर नाही CNG वर धावणार Bajaj ची नविन बाईक, Platina पेक्षा देणार जास्त मायलेज

SCROLL FOR NEXT