बातम्या

खातेदारांचे पैसे सुरक्षित मात्र, कॉसमॉस बँकेचे एटीएम 2 दिवस बंद

सकाळ न्यूज नेटवर्क

पुणे : परदेशातुन कॉसमॉस बँकेवर झालेल्या सायबर हल्ल्यामुळे बँकेचे तब्बल 94 कोटी 42 लाख रुपये ऑनलाइन चोरुन अन्य खात्यावर जमा करण्यात आले. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून पुढील दोन दिवस कॉसमॉस बँकेचे सर्व एटीएम पुर्णत: बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती कॉसमाॅस बँकेचे अध्यक्ष मिलिंद काळे यांनी 'सकाळ'शी बोलताना दिली आहे.

बँकेतून काढलेले सर्व पैसे हे एकाच दिवशी म्हणजे 11 ऑगस्ट रोजी काढलेले नसुन पुढील दोन ते तीन दिवसामध्ये भारत, कॅनडा आणि हाँगकाँगसह 29 देशांतील विविध एटीएम सेंटरवरून काढण्यात आलेले आहेत. सुमारे 12 हजारहून अधिक 'ट्रान्झॅक्शन' परदेशात तर 2 हजार 800 ट्रान्झॅक्शन फक्त भारतात झाले आहेत. त्यामुळे हा मोठा घोटाळा आहे. या मागे मोठी आंतरराष्ट्रीय संघटीत गुन्हेगारी यंत्रणा असल्याचे काळे यावेळी सांगितले.

हल्ला कॉसमॉस बँकेच्या सर्व्हरवर नाही!
कॉसमॉस बँकेच्या सर्व्हरवर हल्ला झाल्याच्या बातम्या खोट्या असून बँकेतील पेमेंट स्वीचवर मालवेयर अॅटॅक झाला आहे. त्यामुळे भारतासह 29 देशांतून एटीएम सेंटरवरून डेबिट कार्ड, रुपे, व्हिसा कार्डचा वापर करून पैसे काढण्यात आले आहेत. त्यामुळे या प्रकरणी सायबर पोलीस, आंतरराष्ट्रीय तपास यंत्रणा, भारतीय रिझर्व्ह बँकेला (आरबीआय) माहिती देण्यात आली आहे. आरबीआयचे अधिकारी सतत संपर्कात असून बँकेला सर्व ती मदत करत आहेत, असंही काळे यांनी यावेळी सांगितलं.

खातेदार आणि ठेविदारांचे पैसे सुरक्षित!
कॉसमॉस बँकेवरील सायबर हल्ल्याची बातमी वाऱ्याच्या वेगानं पसरल्याने खातेदार आणि ठेविदारांमध्ये चिंतेचं वातावरण पसरले आहे. मात्र त्यांनी कोणतीही काळजी करण्याची गरज नाही. सर्व ठेवीदार, गुंतवणुकदारांचे पैसे सुरक्षित आहे, असेही त्यांनी स्पष्ट केलं. अपहार हा बँकेच्या पैशांचा झाला आहे. त्यासंदर्भात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. सर्व तपास यंत्रणा बँकेला सहकार्य करत आहेत. त्यामुळे चिंतेचं कारण नाही, असंही ते म्हणाले.

खबरदारी म्हणून 15 व 16 ऑगस्ट रोजी एटीएम बंद ठेवण्यात येत असली तरी बँकेच्या शाखांमधून सर्व व्यवहार सुरळीत सुरू आहेत. खातेदारांना त्यांच्या व्यवहारात कोणताही अडथळा येणार नाही. तसेच आरटीजीएसवरून देखील व्यवहार सुरू असल्याची माहिती काळे यांनी यावेळी दिली.

WebTitle : MARATHI NEWS all ATMs for Cosmos Bank closed on nexrt two days Hackers swindle Rs 94 crore from Cosmos Bank in Pune

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sanjay Raut: सांगलीत भाजपचा अधिकृत अन् एक अनधिकृत उमेदवार; संजय राऊतांचा विशाल पाटील यांना टोला

Acidity Tips: वारंवार पित्त खवळंतय?हे घरगुती उपाय ठरतील रामबाण

Today's Marathi News Live : राम सातपुते यांची सोशल मीडियावर बदनामी; काँग्रेस कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल

Voter Awareness Programme: मतदान करा हाे... मतदान करा..., मावळात वासुदेव करताहेत मतदारांची जागृती

Teeth Whitening Tips : पिवळेपणा जाऊन दात मोत्यासारखे चमकतील; आठवडाभर ट्राय करा 'या' पेस्ट

SCROLL FOR NEXT