बातम्या

किती जागा येतील हे सांगायला मी काही ज्योतिषी नाही आणि पोपटालाही विचारलेलं नाही : अजित पवार

सकाळ न्यूज नेटवर्क

पुणे : `आमच्या लोकसभा निवडणुकीत किती जागा येतील, हे सांगायला मी काही ज्योतिष नाही किंवा पोपटलाही त्याबाबत विचारलेलं नाही,' अशा शब्दांत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी निवडणुकीच्या निकालाचा अंदाज व्यक्त करणे अवघड असल्याचे स्पष्ट केले.

गेल्या लोकसभा निवडणुकीत मोदी लाट हा `अंडर करंट` कुणालाही कळला नव्हाता. ना भाजपला ना आम्हाला ना मीडियाला. यावेळी काय अंडरकरंट काय ते मला कळलं असता तर.., असे म्हणत अजितदादांनी त्यावर एक्झिट पोलचे अंदाज खरेच ठरतील, असे वाटत नसल्याचे स्पष्ट केले.

भाजपच्या काही उमेदवारांनी निकालाच्या आधीच लाडू तयार करायला घेतलेत, असे निदर्शनास आणून दिल्यानंतर कुणी लाडू तयार करावेत का काय, हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. पण यातून संबंधितांचा अति आत्मविश्वास दिसतोय, असे मत व्यक्त केले.

राष्ट्रवादीचे नेते जयदत्त क्षीरसागर हे पक्ष सोडून शिवसेनेत जाणार असल्याबाबत अजितदादा म्हणाले की जयदत्त यांची नाराजी गेल्या एक वर्षांपासून होती. जयदत्त यांचा घरातील वाद यासाठी कारणीभूत आहे.  यातून मार्ग काढावा यासाठी अनेकदा वरिष्ठ पातळीवर प्रयत्न झाले. विधानसभा निवडणुकीसाठी तिकीट मिळणार नाही, तिथं संदीप यांना तिकीट दिलं जाईल, असं त्यांना वाटलं असावं. त्यांना लोकसभा लढवण्याची ऑफर दिली होती. पण त्यांनी ती नाकारली. बीडची जागा युतीत सेनेकडे राहील अशी शक्यता पाहून ते सेनेत गेले असावेत. लोकसभेनंतर मंत्रिपद मिळणार, अशा चर्चा आहेत. एक आमदार गेल्याने पक्षाचं नुकसान होतच, पण अधिक काम करून भर काढू.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Udayanraje Bhosale Acting | भर मंचावरुन उदयनराजे भोसले यांनी Shashikant Shinde यांची नक्कल केली?

Gopichand Padalkar On Sharad Pawar | "साडेतीन जिल्ह्यांचे नेते.." पडळकरांची शरद पवारांवर जहरी टीका

Raj Thackeray: २० वर्षांनी 'राज'योग! ठाकरे-नारायण राणे २ दशकांनंतर एकाच व्यासपीठावर

Nashik Lok Sabha : नाशिकमध्ये पुन्हा ट्विस्ट, शांतिगिरी महाराजांसह ६ जणांचे उमेदवारी अर्ज अवैध, पण...

Today's Marathi News Live : कुणाला मालक होऊ देऊ नका मी तुमचा सेवक आहे: संजय पाटील

SCROLL FOR NEXT