बातम्या

 आम्ही तर माणसे आणि जनावरे जगविणारे आहोत - रोहित पवार

सकाळ न्यूज नेटवर्क


विधानसभा 2019 : कर्जत-जामखेड - ‘काही लोक माझी शिकार करायला निघाले होते. मात्र, हे शिकार करण्याचे दिवस नाहीत. आम्ही तर माणसे आणि जनावरे जगविणारे आहोत. हिंमत असेल माझी शिकार करून दाखवा,’’ असे आव्हान राष्ट्रवादी काँग्रेसचे युवानेते रोहित पवार यांनी आज विरोधकांना दिले.

पवार यांनी आज कर्जत-जामखेड मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे उमेदवारी अर्ज दाखल केला. त्याआधी झालेल्या जाहीर सभेत पवार बोलत होते.

पवार म्हणाले, ‘‘विरोधक म्हणतात, ‘रोहित पवार आमदार होणार; मात्र पुन्हा दिसणार नाही.’ या निमित्ताने, मी आमदार होणार, हे तर विरोधकही मान्य करतात. तुम्ही मंत्री झाल्यावर या भूमीत किती वेळा आलात, हा आमचा सवाल आहे. येथील जनतेला परिवर्तन हवे आहे.’’ मतदारसंघात दारू वाटणार नाही, असा निर्धारही त्यांनी व्यक्त केला. वंचित बहुजन आघाडीचे युवक जिल्हाध्यक्ष भास्कर भैलुमे, हळगावचे सरपंच संजय ढवळे, उपसरपंच अशोक रंधवे यांनी या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

Web Title: Maharashtra VidhansSabha 2019 Rohit Pawar NCP Politics

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Hoarding Collapse: पुणे-सोलापूर रोडवरील भलं मोठं होर्डिंग कोसळलं; अनेक वाहनांसह घोडा अडकला

Maharashtra Rain News : राज्यात आजही अवकाळी पाऊस, वादळी वाऱ्याचा तडाखा; केळीच्या बागा भूईसपाट, विदर्भाला अतिवृष्टीचा इशारा

Today's Marathi News Live: पुणे सोलापूर रोडवर होर्डिंग कोसळलं; वाहनांचं मोठं नुकसान

Team India Head Coach : गौतम गंभीर होणार भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक?; २ संकेत अन् जोरदार चर्चा

Arvind Kejriwal: 'उद्या मी सर्व नेत्यांसोबत भाजप मुख्यालयात येतोय, ज्यांना अटक करायची आहे, करा', केजरीवाल यांचं थेट PM मोदींना आव्हान

SCROLL FOR NEXT