Narendra Modi Addressing Nation
Narendra Modi Addressing Nation 
बातम्या

लाॅकडाऊन हा शेवटचा पर्याय असावा....पंतप्रधानांचे राज्यांना आवाहन

साम टिव्ही ब्युरो

नवी दिल्ली : सर्व राज्यांनी लाॅकडाऊन हा शेवटचा पर्याय ठेवावा, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी Narendra Modi यांनी आज केले. मोदी यांनी आज रात्री देशाला उद्देशून भाषण केले. देशातल्या युवकांनी Youth कोविड कमिट्या कराव्यात, राज्यांनी मजुरांना भरवसा द्यावा, असेही आवाहन त्यांनी केले. राज्यांनी मायक्रो कंटेनमेंट झोनच्या Micro Containment Zones माध्यमातून कोरोनाला आळा घालावा, असेही आवाहन मोदींनी केले. Lock Down should be last resort PM Modi Appeals To States

यावेळी बोलताना ते म्हणाले, "हे कोरोनाचे वादळ देशावर आले आहे. दुसरी लाट घोंगावते आहे.  धैर्य नाही सोडले पाहिजे. योग्य निर्णय, योग्य दिशेने प्रवास यातूनच विजय मिळेल. आज देश दिवसरात्र काम करतो आहे. गेल्या काही दिवसांत जे निर्णय घेतले आहेत, त्यातून परिस्थिती सुधारेल. Oxygenची मागणी वाढली आहे. त्यावर पूर्ण संवेदनशीलतेने काम सुरु आहे. केंद्र, राज्य सर्वांचे प्रयत्न आहेत की आवश्यक त्याला आॅक्सिजन मिळेल. देशातील अनेक भागात ऑक्सिजन ची मागणी मोठी आहे कोरोना काळात,  गरजूना ऑक्सिजन पुरवणार सरकार प्रयत्नशील आहे. नवीन ऑक्सिजन प्लांट बनवले जाताहेत." 

"देशात १२ कोटी लस Corona Vaccine दिली गेली आहे. सर्वात स्वस्त लस भारताने बनवली. १ मे पासून १८ वर्षांवरील सर्वांना लस दिली जाईल. शहरांमध्ये जो वर्क फोर्स आहे त्याला लस उपलब्ध होईल. गेल्या वर्षी जी परिस्थिती होती ती आजच्या पेक्षा वेगळी होती. वैद्यकीय उपकरणे, पीपीई किट, तपासणी लॅब या सगळ्या व्यवस्था आपण उभ्या केल्या आहेत.  मजुरांनी स्थलांतर करु नये याची काळजी राज्यांनी घ्यावी, त्यांच्या मनात विश्वास निर्माण करावा," असेही मोदी म्हणाले. Lock Down should be last resort PM Modi Appeals To States

"युवकांनी आपापल्या भागात यंत्रणा उभी करावी. जागरुकता करावी. ज्यातून कंटेनमेंट झोन निर्माण करण्याची गरजच पडणार नाही. आज माझ्या बालमित्रांनी घरातल्या लोकांना बाहेर पडू न देण्याची काळजी घ्यावी, असे माझे आवाहन आहे. प्रसारमाध्यमांनीही आपले प्रयत्न वाढवावेत. अफवांच्या जाळ्यात लोक येऊ नयेत हे पाहून. आपल्याला लाॅकडाऊन पासून वाचवायचे आहे. राज्यांनी लाॅकडाऊन हा शेवटचा पर्याय ठेवावा. मायक्रो कंटेनमेंट झोनच्या माध्यमातून कोरोनाची साथ आटोक्यात आणावी." असेही आवाहन मोदी यांनी केले. 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Breakfast Recipes : सकाळी ऑफिसला जाण्याच्या घाईत झटपट होणारा नाश्ता; 5 हेल्दी रेसिपी

Baramati Lok Sabha Votting Live: शरद पवारांनी बजावला मतदानाचा हक्क, पाहा VIDEO

Baramati Lok Sabha: आमदार रोहित पवारांना तातडीने अटक करा; राष्ट्रवादी युवक काँग्रेसची मागणी, बारामतीत काय घडतंय?

Nashik Lok Sabha: नाशिक जिल्ह्यातील'या' दिग्गज उमेदवारांना निवडणूक अधिकाऱ्यांची नोटीस, काय आहे नेमकं प्रकरण?

योगा केल्यानंतर प्या Health Drinks, आरोग्य राहील निरोगी

SCROLL FOR NEXT