Kalyan Railway Police have arrested a youth for making a fake identity card 
बातम्या

रेल्वे प्रवासासाठी मुंबई महापालिकेचे बोगस आयकार्ड बनवणे आले अंगलट !

साम न्युज ब्युरो

कल्याण : कोरोना Corona काळात लॉकडाऊन Lockdown मुळे बेरोजगार झालेल्या तरुणाला एक अतरंगी कल्पना सुचली. लॉकडाऊन काळात रेल्वे Railway प्रवास सर्वसामान्यांसाठी  बंद करत केवळ अत्यावश्यक सेवेतील नागरिकांना प्रवासाची मुभा देण्यात आली आहे. मात्र रस्त्याने प्रवास परवडत नसल्याने अनेक नागरिक रेल्वेने प्रवास करण्याची परवानगी मिळविण्याचा प्रयत्न करत आहेत. अशाच प्रवाशांना हेरून त्यांना अत्यावश्यक सेवेतील बनावट ओळखपत्र बनवून देणाऱ्या एका २८ वर्षीय उच्चशिक्षित तरुणाला कल्याण रेल्वे पोलिसांनी अटक केली आहे. 

धनंजय बनसोडे असे या तरुणाचे नाव आहे. त्याच्याकडून ४ बनावट ओळखपत्र तसेच ओळखपत्र तयार करण्याचे फॉर्म आणि मुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागाचा स्टॅम्प आणि सही शिक्का पोलिसांनी जप्त केला आहे. रेल्वे न्यायलयाने या आरोपीला शिक्षा म्हणून तीन दिवसाची पोलीस कस्टडी सुनावली आहे.

डोंबिवली Dombivali येथे राहणारा धनंजय मुंबई महापालिकेच्या BMC 'फ' प्रभाग कार्यालयातील आरोग्य विभागात कंत्राटी पद्धतीने काम करत होता. तीन महिन्यापासून त्याला पगार मिळत नसल्याने पैशाची जमवाजमव कशी करायची या विवंचनेत तो होता. धनंजय याला प्रवासा दरम्यान तेथील नागरिक ओळखपत्र कोठे मिळेल अशी विचारणा करताना आढळले. यातूनच कल्पना सुचल्याने त्याने तीन दिवसापूर्वी बनावट ओळखपत्र तयार करण्याचा निर्णय घेतला.

यासाठी त्याने काम करत असलेल्या कार्यालयातून रबर सही शिक्क्याचा स्ट्म्प आणि कोरे फॉर्म मिळवले. यानंतर त्याने अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी म्हणून रेल्वे प्रवास सवलत मिळण्यासाठी 'कोणाला ओळखपत्र हवे असतील तर आपल्याशी संपर्क साधावा' असे आवाहन फेसबुक मार्फत केले होते. यानंतर हाच मेसेज त्याच्या अंगलट आला.

हे देखील पहा -

हा मेसेज एका अज्ञात व्यक्तीने रेल्वे आयुक्तांना पाठवला. हा मेसेज पाहून रेल्वे आयुक्तांनी याप्रकरणी तातडीने चौकशी करण्याच्या सूचना दिल्या. यानंतर कल्याण रेल्वे पोलिसांनी त्याच्याशी संपर्क साधत बनावट ग्राहक बनून त्याला कल्याण रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक १ वर पकडले. मागील तीन दिवसात त्याने ६ ओळखपत्र तयार करून दिली आहेत. यातील ४ कार्ड आणि कार्ड बनविण्याचे साहित्य जप्त केल्याचे कल्याण रेल्वे पोलिसांनी माहिती दिली आहे. 

Edited By- Sanika Gade

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT