बातम्या

गुगलच्या नव्या सेवा भारतात 

सकाळ न्यूज नेटवर्क

नवी दिल्ली येथे नुकत्याच झालेल्या ‘गुगल फॉर इंडिया’च्या पाचव्या पर्वात गुगलने अनेक नव्या गोष्टी खास भारतीयांसाठी आणल्या आहेत. कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून भारतीयांच्या दैनंदिन कार्यात सुलभता आणण्यासाठी गुगलने बेंगळुरूमध्ये खास एआय लॅब स्थापन केली आहे. त्याशिवाय गुगल असिस्टंटची सेवा आता प्रादेशिक भाषेतही उपलब्ध झाली आहे. जाणून घेऊया गुगलने सादर केलेल्या नव्या उत्पादनांविषयी...

गुगल लेन्स (Google Lens) : स्मार्टफोनमधील कॅमेराचा वापर करून अनेक गोष्टी सोप्या होणार आहेत. उदा. भाषांतर करणे, एखादी वस्तू, प्रेक्षणीय स्थळे, पदार्थ ओळखणे, एखादा मजकूर स्कॅन करून त्याची माहिती सांगणे किंवा सर्च करणे सोपे होणार आहे. एवढेच नव्हे; तर आता गुगल लेन्स सुविधा मराठीतसुद्धा उपलब्ध होत आहे. म्हणजे माहिती नसलेल्या भाषेतील मजकूर स्कॅन केल्यास तो लगेच मराठीत भाषांतर करून देईल.

बोलो (Bolo) : लहान मुलांना भाषा शिकवण्यासाठी हे ॲप बनवण्यात आले असून, वाचन, शब्दोच्चार कसे करावेत, याबाबत मार्गदर्शन करते. आतापर्यंत हिंदी आणि इंग्रजीमध्ये असलेले हे ॲप आता मराठीसह बंगाली, तमीळ, तेलुगू, उर्दू भाषेतही उपलब्ध होत आहे. आतापर्यंत  लाख मुलांनी या सुविधेचा लाभ घेतल्याची माहिती गुगलने दिली आहे.

गुगल असिस्टंट (Google Assistant) : गुगलच्या स्मार्ट व्हॉईस असिस्टंटमध्ये आता अनेक नव्या सुविधा भारतीयांसाठी सादर करण्यात आल्या आहे. गेल्या वर्षी गुगल असिस्टंटची सुविधा मराठी भाषेत उपलब्ध झाली होती. भारतात गुगल असिस्टंटचा वापर करण्याचे प्रमाण वाढत असून त्यासाठी इंग्रजीनंतर हिंदी ही जगातली दुसरी भाषा ठरली आहे. सर्च करताना गुगल असिस्टंटला ‘ओके गुगल स्पीक टू मी इन मराठी’ असं सांगा. त्यापुढे असिस्टंट तुमच्याशी मराठीत बोलेल! गुगल असिस्टंट आता इंटरनेटशिवायसुद्धा वापरता येणार असून ही सुविधा तूर्तास व्होडाफोन आयडिया ग्राहकांसाठीच आहे. यासाठी तुम्हाला ८००९१९१००० या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधून प्रश्न विचारून गुगलकडून उत्तरे मिळवता येतील! एवढेच नव्हे; तर लवकरच गुगल असिस्टंटच्या मदतीने तुम्हाला जेवण ऑर्डर करता येईल, कॅब बुक करता येईल!

गुगल सर्च डिस्कव्हर : गुगल सर्च करताना डावीकडे स्वाईप केल्यावर आपल्याला आपण सर्च केल्याप्रमाणे संबंधित निकाल दिसतात. यासाठी गुगलकडून Discover या सेवेचा वापर केला जातो. यापुढे तुम्हाला केवळ इंग्रजीच नव्हे; तर मराठी भाषेतील निकालदेखील पाहायला मिळतील.

स्पॉट प्लॅटफॉर्म : ‘गुगल पे’ची ही एक नवी सेवा असून ऑनलाईन आणि ऑफलाईन विक्रेते, व्यावसायिकांना त्यांच्या ग्राहकांसाठी खरेदी करण्यासाठी नवनवे पर्याय उपलब्ध करून देता येईल. UrbanClap, Goibibo, MakeMyTrip, RedBus, Eat.Fit व Oven Story हे सध्या या सेवेचा वापर करत आहेत. याद्वारे विक्रेत्यांना त्यांची उत्पादने ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यासाठी वेगळ्या ॲप किंवा वेबसाईटची गरज राहणार नाही.

गुगल पे फॉर बिझनेस : गुगलचे हे नवे ॲप खास व्यावसायिकांसाठी तयार केले असून याद्वारे त्यांना व्यवसायासाठी पेमेंटचे पर्याय उपलब्ध करून देता येतील. पैसे स्वीकारणे, त्याची नोंद ठेवणे आदी बाबी सोप्या जातील.

गुगल पे जॉब्स : स्किल इंडिया अंतर्गत ‘नॅशनल स्किल्स डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन’सोबत भागीदारी करून गुगल पे ॲपद्वारे रोजगारांबाबत माहिती उपलब्ध करून देणार आहे. यासाठी काही कंपन्यांसोबत गुगलने करार केला  असून तुम्हाला नवनवीन नोकरीच्या संधी गुगल पेवर उपलब्ध होतील.


Web Title: Google launches new service in India

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Local : लोकल ट्रेनमध्ये आणखी एक धक्कादायक प्रकार; नशेखोर तरुणांनी केला प्रवाशाचा चाकूने भोसकून खून

Navi Mumbai BJP News | नवी मुंबईच्या भाजप पदाधिकाऱ्यांचे राजीनामे, कारण काय?

Chitra Wagh Video: Ullu App चं नाव घेत चित्रा वाघ यांचा ठाकरे पिता पुत्रांवर सनसनाटी आरोप!

Juice For Diabetes : मधुमेहाच्या रुग्णांनी 'या' ज्यूसचे करा सेवन, ब्लड शुगर राहिल नियंत्रणात

Special Report: अल्टिमेटम संपला तरी Vishal Patil ठाम! सांगलीत पाटलांवर कारवाई होणार?

SCROLL FOR NEXT