goat news
goat news 
बातम्या

शेळ्यांचेही होतंय ऑनलाईन ट्रेडिंग...

प्रसाद नायगावकर

यवतमाळ : उच्च शिक्षण घेतले की प्रत्येकाला अपेक्षा असते. एखाद्या मोठ्या पगाराच्या नोकरीची Job, त्यासाठी अनेक प्रयत्नही केले जातात. पण असाही एक तरुण आहे जो मेकॅनिकल अभियांत्रिकीची mechanical engineering पदवी घेऊनही त्याचे मन नोकरीत रमले नाही. स्वतःचा एक व्यवसाय Business असावा यासाठी मनाशी खूणगाठ बांधत त्याने नोकरी सोडली. Goats are also traded online

आता गोट फार्मच्या ऑनलाईन ट्रेडिंग Goat Farm's online trading मधून आर्थिक उन्नतीची वाट गवसलेला यवतमाळ Yavatmal जिल्ह्यातील राळेगाव Ralegaon येथील युवक विशाल धनकसार Vishal Dhanaksara हा युवकांसाठी प्रेरणास्थान बनला आहे. गोटफार्म, बटेर पालनातून ऑनलाईन Online ट्रेडिंगची कास धरून, त्याची वार्षिक उलाढाल ५० लाखांच्या  घरात पोहचली आहे. त्याने केलेल्या व्यवसायात त्याचा चांगलाच जम बसवला आहे.

नोकरी सोडली तेंव्हा विशाल समोर अनेक आव्हाने होती. विचारपूर्वक त्याने गोटफार्मचा व्यवसाय निवडला. त्यासाठी त्याने आपले सर्वस्व झोकले. हा व्यवसाय करतांना त्याच्यासमोर अनंत अडचणी आल्या होते. मात्र सर्व समस्येतून त्याने वाट काढली. मोठ्या मुश्किलीने बँकेतून Bank कर्ज उपलब्ध करून घेतले. गोट फार्मसहित बटेर पालनही सुरू केले. Goats are also traded online

हळूहळू त्यालाशेतकऱ्यांचा चांगला प्रतिसादही मिळाला. बकरे कटाईसाठी देण्याऐवजी शेतकऱ्यांना जातिवंत शेळया दिल्या. सिरोही ,सोजत ,उस्मानाबादी आदी जातिवंत शेळ्या त्यांनी आणले, पण व्यवसाय करतांना उत्पन्न आणि नफा मिळविण्यासाठी बराच अवधी लागतो. काळाची पावले ओळखत त्याने ऑनलाईन ट्रेडिंग सुरु केले. याचा त्याला चांगलाच फायदा झाला. आता तो जवळपास १०० व्हॉट्सअ‍ॅप WhatsApp ग्रुपशी कनेक्ट आहे.

या ग्रुपच्या माध्यमातून तो भारतभरातील गोटफार्म मालकांशी संपर्क साधतो. यातून ऑनलाईन ट्रेडिंग जाळे त्याने विणले आहे. पंजाब, राजस्थान येथून माल घ्यायचा आणि शेतकऱ्यांना ऑनलाईन ट्रेडिंग पद्धतीने परस्पर विकायचे. या कल्पक पद्धतीने व्यवसाय केल्याने तो भरघोस नफा Profit कमवत आहे. नवयुवकांनी फक्त नोकरीकडे न जाता आपल्यासारख्या व्यवसायात उतरावे, ही त्याची इच्छा आहे. यासाठी युवकांनी पुढाकार घेऊन समोर यावे, त्यांना त्यांच्या व्यवसायासाठी हवी ती मदत करण्याची विशालची तयारी आहे. म्हणूनच विशाल हा युवकांसाठी युथ आयकॉन ठरत आहे.

Edited By- Digambar Jadhav

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Prajwal Revanna: सेक्स स्कँडलने कर्नाटकच्या राजकारणात खळबळ! देवेगौडांच्या नातू अन् मुलावर गुन्हा दाखल; शेकडो क्लिप्स व्हायरल

HSC SSC Result: मोठी बातमी! दहावी, बारावीच्या निकालाची तारीख ठरली; कुठे अन् कसा पाहाल निकाल?

Weather Alert: राज्यात पुढील ४ दिवसांत उष्णतेची लाट येणार; मे महिन्याचा पहिला आठवडा 'ताप'दायक ठरणार

Petrol Diesel Rate 29th April 2024: पेट्रोल-डिझेलच्या दरात बदल? जाणून घ्या देशासह महाराष्ट्रातील आजचे भाव

Narendra Modi: PM मोदींची आज पुण्यात सभा, शहरातील अनेक रस्ते राहणार बंद; वाहतुकीसाठी पर्यायी मार्ग कोणते?

SCROLL FOR NEXT